30.5 C
Latur
Monday, March 1, 2021
Home महाराष्ट्र मंत्रालयात कोरोनाचा पुन्हा शिरकाव, महसूल विभागातील ८ कर्मचारी पॉझिटीव्ह

मंत्रालयात कोरोनाचा पुन्हा शिरकाव, महसूल विभागातील ८ कर्मचारी पॉझिटीव्ह

एकमत ऑनलाईन

मुंबई,दि.२२ (प्रतिनिधी) राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असताना राज्याचे मुख्यालय असलेल्या मंत्रालयातही कोरोनाचा शिरकाव झाला आहे. काही मंत्र्यांना यापूर्वीच कोरोनाची बाधा झालेली असताना आज महसूल विभागातील अनेक कर्माचा-यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली आहे. दुसऱ्या लाटेचा धोका टळेपर्यंत राज्यभरातून विविध कामासाठी मंत्रालयात येणा-या अभ्यागतांवर निर्बंध आणण्याची मागणी अधिकारी संघटनेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना आज मंत्रालयातील महसूल विभागातील ८ कर्मचारी कोरोना पॉझिटीव्ह आढळले. महसूल विभागातील २२ कर्मचारी गैरहजर असल्याचे संबंधितांच्या लक्षात आले हे कर्मचारी आजारी असल्याने कामावर आले नसल्याचे सांगण्यात आले मात्र अधिक चौकशी केली असता या २२ कर्मचा-यांपैकी ८ कर्माचा-यांना कोरोनाची लागण झाल्याचे समजले. उर्वरित कर्मचारीही आजारी असल्याने त्यांची कोरोना चाचणी केली जाणार असल्याने बाधितांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र मंत्रालय अधिकारी संघटनेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना पत्र लिहून दुसऱ्या लाटेचा धोका टळेपर्यंत मंत्रालयात येणा-या अभ्यागतांवर निबंध आणण्याची मागणी केली आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे संक्रमण वेगाने पसरत आहे व त्यामुळे कोरोनाची दुसरी लाट येण्याचा धोका निर्माण झाला आहे. मुंबईतील रुग्णसंख्येतही दरदिवशी दुपटीने वाढ होताना दिसत आहे. मंत्रालयात राज्यभरातील विविध भागांतून लोक येतात. या लोकाच्या शरीराचे तापमान नोंदणे, हाताचे निर्जंतुकीकरण करणे याची कोणतीही व्यवस्था नसल्याने मंत्रालयात कोरोनाचा धोका वाढला आहे. त्यामुळे मंत्रालयात येणाऱ्या अभ्यागतांवर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा धोका टळेपर्यंत निर्बंध आणावेत अशी मागणी महाराष्ट्र मंत्रालय अधिकारी संघटनेने केली आहे.

प्रेमसंबंधातून केला ‘त्या’ दिव्यांग व्यक्तिचा खुन

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,438FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या