30.9 C
Latur
Monday, May 10, 2021
Homeमहाराष्ट्रवयोमर्यादा बाद झालेल्यांना परीक्षेची पुन्हा संधी; एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा

वयोमर्यादा बाद झालेल्यांना परीक्षेची पुन्हा संधी; एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा

एकमत ऑनलाईन

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सन २०२० आणि २०२१ मधील महाराष्ट्र लोकसेवा आयोग(एमपीएससी)च्या नियोजीत परीक्षा होऊ शकल्या नाहीत़ अशाच वयाचे ठराविक बंधन असलेल्या काही परीक्षा झाल्या नसल्याने सदर विद्यार्थ्यांनी आपल्या वयाची मर्यादा ओलांडल्याने ते पुढच्या वर्षी अपात्र ठरू शकणार होते़ म्हणून विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करता अशा विद्यार्थ्यांना वयात सूट देऊन पुन्हा एकदा संधी मिळणार असल्याची माहिती रविवार दि़ १८ एप्रिल रोजी राज्याचे सामान्य प्रशासन मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे़

यामागील वर्षी नियोजित असलेल्या एमपीएससीच्या सर्वच परीक्षा कोरोनामुळे होऊ शकल्या नाहीत. काही दिवसांपूर्वी राज्य सेवेची पूर्व परीक्षा पार पडली, परंतु अनेक विद्यार्थ्यांनी पेपर दिला नाही. दरम्यान, पोलिस उपनिरीक्षक पदासाठी (पीएसआय) खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना ३१ तर इतर प्रवर्गातील विद्यार्थ्यासाठी ३३ वयोमर्यादा आहे. तर राज्य सेवेच्या पूर्व परीक्षांसाठी खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना ३८ तर अन्य प्रवर्गातील उमेदवारांसाठी ४३ वयोमर्यादा निश्­चित करण्यात आलेली आहे. मागील वर्षीची परीक्षा अजूनही झाली नसल्याने बहुतांश विद्यार्थ्यांनी वयोमर्यादेचा निकष ओलांडला असून, त्यांना वाढीव संधी मिळावी, अशी मागणी स्टूडंट राईट्स असोसिएशननेदेखील लावून धरली होती.

या पार्श्वभूमीवर सामान्य प्रशानाच्या प्रस्तावावर सकारात्मक निर्णय घेऊन वयोमर्यादा संपुष्टात आलेल्या विद्यार्थ्यांना एक संधी वाढवून द्यावी, असे निर्देश आयोगाला दिले जाणार आहेत. तत्पूर्वी, राज्याच्या विविध विभागांमध्ये अडीच लाखांपर्यंत पदे रिक्­त आहेत. मात्र, मेगाभरतीची प्रक्रिया अजूनही सुरु झालेली नाही. सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेला मराठा आरक्षणाचा प्रश्­न आणि कोरोनामुळे राज्याची बिघडलेली आर्थिक स्थिती ही दोन प्रमुख कारणे त्यामागे असल्याचे वित्त विभागातील वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून सकारात्मक निर्णय
कोरोनाच्या महामारीमुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा लांबणीवर पडल्या. आता कोरोनाच्या दुस-या लाटेमुळे विद्यार्थ्यांचा एक पेपर पुढे ढकलला आहे. परंतु, २०२१ मध्ये होणा-या पदभरतीत वयोमर्यादा संपलेल्या या विद्यार्थ्यांना निश्­चितपणे एक संधी वाढवून दिली जाईल. त्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना प्रस्ताव पाठवून त्यावर सकारात्मक निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे़

काय आहेत ठळक बाबी?
– आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या अभिप्रायानंतरच संयुक्­त पूर्व परीक्षेचे ठरणार वेळापत्रक
– एप्रिलअखेर होणार वेळापत्रकाची घोषणा; १५ जूनपर्यंत परीक्षा घेण्याचे आयोगाचे नियोजन
– मुख्य परीक्षा उत्तीर्ण झालेल्या ४२० उमेदवारांच्या नियुक्­तीचा प्रश्­न प्रलंबितच
– राज्याच्या विविध विभागांमध्ये ३० हजारांहून अधिक गट-‘अ’ व ‘ब’ची पदे रिक्­त; तरीही आयोगाकडे मागणीपत्र नाहीत
– २०२१ च्या वेळापत्रकात वयोमर्यादा संपलेल्या विद्यार्थ्यांना मिळणार वाढीव एक संधी

लसीकरण प्रकियेत पारदर्शकता आणा; माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे पंतप्रधानांना ५ सल्ले

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,494FansLike
184FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या