34.5 C
Latur
Monday, May 10, 2021
Homeमहाराष्ट्रआंतरजिल्हा प्रवासासाठी पुन्हा ई-पासची गरज

आंतरजिल्हा प्रवासासाठी पुन्हा ई-पासची गरज

एकमत ऑनलाईन

मुंबई : महाराष्ट्रात सध्या कोरोनाचा उद्रेक झाला आहे. रोज मोठ्या संख्येने आढळणारे रुग्ण व होणारे मृत्यू हे आवरण्याबाहेर जात असल्याने राज्यसरकारने अधिक कडक निर्बंध लागू केले आहेत. ब्रेक द चेन या लक्ष्यांतर्गत अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यवहार बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. नागरिकांना आंतरजिल्हा प्रवासावर बंदी घातली आहे. त्यामुळे काही अत्यंत महत्त्वाची व टाळता न येण्याजोगी बाब असेल तरच ई – पास काढून प्रवास करता येणार आहे. पहिल्या लॉकडाऊनमध्ये ज्याप्रमाणे ई-पास काढून प्रवासाची मुभा दिली होती, तशीच पुन्हा आता आंतरजिल्हा व आंतरराज्य प्रवासासाठी ई- पासची गरज पडणार आहे.

नागरिकांना अत्यावश्यक कारणासाठी प्रवास करायचा असेल तर ई पास काढून तो करता येईल. यासाठी महाराष्ट्र पोलिसांनी त्यांचे संकेतस्थळ उपलब्ध करुन दिले आहे. नागरिकांनी संकेतस्थळावर अर्ज करावा आणि ई पास काढून प्रवास करावा, असे आवाहन केले आहे. ऑनलाइन ई पास काढण्यामध्ये अडचण येत असेल तर त्यासाठी पोलिस स्टेशनची मदत घेऊ शकता असेही महाराष्ट्र पोलिसांच्यावतीने सांगण्यात आले आहे.

ई पास काढावयाची पद्धत :
– ई पास काढण्यासाठी तुम्ही https://covid19.mhpolice.in/ या संकेतस्थळावर जा.
-संकेतस्थळावर https://covid19.mhpolice.in/registration पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला काही माहिती भरावी लागेल.
– त्यामध्ये तुम्हाला कोणत्या जिल्ह्यातून किंवा राज्यातून कुठे प्रवास करायचा आहे ते निवडा.
– तुम्हाला काही कागदपत्रे इथे जोडावी लागतील.
– प्रवास कोणत्या कारणासाठी करत आहेत याची माहिती द्या.
– कागदपत्रांची माहिती एकत्रित घेऊन ती अपलोड करा.

टोकन आयडी महत्त्वाचा
– तुम्ही अर्ज केल्यानंतर एक टोकन आयडी मिळतो. तुमचा अर्ज मंजूर झाला की नाही? तसेच ई-पास काढण्यासाठी तो टोकन आयडी गरजेचा आहे. टोकन आयडी टाकून साइटवरून ई-पास डाऊनलोड करता येतो.
– ई-पासवर तुमची वैयक्तिक माहिती, खासगी वाहनाने प्रवास करणार असल्यास त्याचा क्रमांक, पासची वैधता, क्यूआर कोड इत्यादी माहिती असते.
– ई-पासची हार्ड कॉपी आणि सॉफ्ट कॉपी सोबत ठेवावी लागेल. पोलिसांनी विचारणा केली तर त्यांना हा पास दाखवून प्रवास करता येतो.

ई-पासची सवलत कधी मिळेल?
– कुटुंबातील व्यक्तीचे लग्न, अंत्यविधी पास घेता येतो.
– आरोग्यसंबंधित तक्रार
– अत्यावश्यक सेवांमध्ये असलेल्या कर्मचा-यांना ई-पासची गरज नाही.

देशातील ८० कोटी लाभार्थ्यांना दोन महिने मोफत धान्य

 

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,494FansLike
184FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या