20.9 C
Latur
Tuesday, September 28, 2021
Homeमहाराष्ट्रमुंबईतील बनावट लसीकरण झालेल्यांचे फेरलसीकरण

मुंबईतील बनावट लसीकरण झालेल्यांचे फेरलसीकरण

एकमत ऑनलाईन

मुंबई : मुंबईतील ज्या लोकांना कोरोनाची बनावट लस देण्यात आली आहे त्या लोकांच्या फेरलसीकरणाचा प्रस्ताव मुंबई महापालिकेने तयार केला आहे. त्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात यावी असा आदेश मुंबई हायकोर्टाने जारी केला आहे. मुख्य न्यायाधीश दिपनकर दत्ता आणि न्या. जी. एस. कुलकर्णी यांच्या खंडपीठाने हा आदेश दिला. मुंबई महापालिकेने जो प्रस्ताव व आराखडा तयार केला आहे त्यात कोणताही बदल न करता येत्या सात दिवसांत त्याला मंजुरी देण्यात यावी असेही हायकोर्टाने आपल्या आदेशात म्हटले आहे.

मुंबईतील एकूण २०५३ जणांना अशी बोगस लस देण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यातील १६१ लोकांचे मुंबई महापालिकेने फेरलसीकरण केले आहे. या लोकांना कोरोना प्रतिबंधक लस म्हणून चक्क सलायन वॉटर टोचण्यात आले होते असे मुंबई महापालिकेच्या वतीने सुनावणीत सांगण्यात आले.

या २०५३ लोकांचे कोविन अ‍ॅपवर फेर रजिस्ट्रेशन करण्याचा प्रयत्न महापालिकेकडून केला जात आहे. यासाठी त्यांचे या अ‍ॅपवर झालेले रजिस्ट्रेशन रद्द करावे लागणार आहे, तरच त्यांना फेर रजिस्ट्रेशन करता येणे शक्­य आहे. त्यासाठी केंद्राची मंजुरी आवश्­यक आहे.

त्यावेळी हायकोर्टाने केंद्र सरकारला हा आदेश दिला. तसेच अशा प्रकारचे बोगस लसीकरण करणाºयांचा तपास करण्यासाठीही हायकोर्टाने मुंबई पोलिसांना तीस दिवसांची मुदत दिली आहे. या अवधीत पोलिसांना या प्रकरणाचा तपास आता पूर्ण करावा लागणार आहे.

उदगीरात सिगारेटच्या धुरामुळे तरुणाचा भोसकून खून

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
194FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या