19.5 C
Latur
Saturday, November 27, 2021
Homeमहाराष्ट्रदिलासादायक, दुसरी लाट ओसरली

दिलासादायक, दुसरी लाट ओसरली

एकमत ऑनलाईन

मुंबई : राज्यातील कोरोना संसर्गाची दुसरी लाट आज पूर्णपणे ओसरताना दिसत आहे. कारण दररोज आढळणा-या कोरोनाबाधितांच्या संख्येत आता मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे. शिवाय कोरोनातून बरे होणा-यांची संख्यादेखील वाढत आहे. कोरोनाबाधित रूग्णांची दररोजची मृत्यू संख्यादेखील घटली आहे, तर कोरोना महामारी सुरू झाल्यापासून मुंबईत पहिल्यांदाच दिवसभरात कोरोनामुळे एकाही रुग्णांचा मृत्यू झाला नसल्याची दिलासादायक बाब समोर आली आहे.

मागील २४ तासांत मुंबईमध्ये एकाही कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झालेला नाही, तर ३६७ नवीन कोरोनाबाधितांची नोंद झालेली आहे. महानगराचा पॉझिटिव्हिटी रेट १.२७ टक्के झाला असून, यामध्ये ५ हजार ३० अ‍ॅक्टिव्ह रूग्ण आहेत, तर रूग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९७ टक्के आहे. मागील २४ तासांमध्ये २८ हजार ६०० पेक्षा जास्त तपासण्या करण्यात आल्या आहेत. सध्या शहरात कोणताही अ‍ॅक्टिव्ह कंटेनमेंट झोन नाही. ५० इमारती या सील राहणार आहेत. कोरोना महामारीची दुसरी लाट शिखरावर असताना मुंबईत मोठ्या संख्येने दररोज कोरोनाबाधित आढळत होते. एका दिवसात ११ हजार कोरोनाबाधितांसह मोठ्या संख्येने कोरोनाबाधितांचे मृत्यू झाल्याचेदेखील समोर आले आहे.

कोरोनाच्या दुस-या लाटेत सुरुवातीला भयावह परिस्थिती निर्माण झालेल्या मुंबईतील परिस्थिती हळूहळू नियंत्रणात येत असल्याचे दिसत आहे. दुस-या लाटेच्या सुरुवातीला मुंबईत कोरोना रुग्णसंख्येचा विस्फोट झाल्याने रुग्णांची बेडसाठी प्रचंड हेळसांड झाली. मात्र, नंतर विविध उपाययोजना करत आणि बेड, रेमडेसिवीर व ऑक्सिजनच्या वाटपात सुसूत्रता आणत मुंबई महापालिकेने परिस्थितीवर पकड मिळविण्याचे प्रयत्न केले.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या