मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे दिवंगत थोरले चिरंजीव बिंदूमाधव ठाकरे यांचे पुत्र निहार ठाकरे यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यामुळे शिवसेना घरातूनच फुटली, अशा चर्चांना उधाण आले आहे.
निहार यांनी शिंदेंच्या भेटीनंतर पत्रकार परिषद घेतली आणि एकनाथ शिंदे यांना कायदेशीर लढाईत पूर्णपणे मदतीचे आश्वासन दिले आहे. निहार हे पेशाने वकील आहेत. त्यांचे स्वत:चे लॉ फर्म आहे.