25 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeमहाराष्ट्रलोणार सरोवराला वन्यजीव अभयारण्याची मान्यता

लोणार सरोवराला वन्यजीव अभयारण्याची मान्यता

एकमत ऑनलाईन

बुलडाणा : जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ आणि जगातील दुसरे सर्वांत मोठे खा-या पाण्याचे सरोवर म्हणून ओळख असलेल्या लोणार सरोवर आणि भोवताली असलेल्या जंगलाला आता संरक्षित व धोकादायक वन्यजीव अभयारण्य म्हणून मान्यता मिळाली आहे. राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबतच्या बैठकीनंतर हे जाहीर केले. यामुळे लोणार सरोवराच्या भोवतालच्या जंगलात असलेले वन्यजीव, पक्षी संरक्षित होणार आहेत.

लोणार सरोवराच्या परिसरातील ३.६५ चौरस कि.मी. क्षेत्रातील रहिवाशांचे पुनर्वसन करून हे क्षेत्र आता अभयारण्य म्हणून लवकरच विकसित करणार असल्याचा निर्णय सरकारने या बैठकीत घेतला आहे. त्यामुळे आगामी काळात लोणार सरोवर याठिकाणी जगभरातून पर्यटक आकर्षित होतील आणि संरक्षित वन्यजीवांचाही अभ्यास करतील अशी सरकारला अपेक्षा आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून लोणार सरोवराचा विकास खुंटला आहे. गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात मुख्यमंत्र्यांनी लोणार सरोवराचा दौरा करून विकासासाठी मोठ्या घोषणाही केल्या होत्या. पण वर्ष उलटून गेल्यावरही लोणार परिसरात कुठलेही विकासाचे काम सुरू झाले नाही.

आता लोणार होईल संरक्षित क्षेत्र!
उशिरा का होईना सरकारने लोणार संरक्षित वन्यजीव अभयारण्य घोषित करण्याचा निर्णय घेतल्याने आता या परिसरातील दुर्मिळ प्राणी, पक्षी संरक्षित होतील. या भागात अतिक्रमण करून राहणा-या नागरिकांना मोबदला देऊन सरकार लवकरच स्थलांतरित करणार असल्याने हा परिसर निर्मनुष्य होईल आणि या भागात वन्यजीवांचा अधिवास संरक्षित होणार आहे. त्यामुळे आगामी काळात लोणार हे फक्त सरोवर न राहता वन्यजीव अभयारण्यसुद्धा नावारूपाला येणार आहे. पर्यटक वाढणार आहेत आणि परिसरातील विकासाला चालना मिळणार आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या