कोयनानगर : कोयना धरण पाणलोट क्षेत्रातील नवजा, महाबळेश्वर, वलवण या ठिकाणी चोवीस तास रेकॉर्डब्रेक पावसाची नोंद झाली. ओहोटीच्या दिशेने निघालेल्या कोयना धरणाच्या पाणीसाठ्यात तब्ब्ल ३ टीएमसीने वाढ होवून धरणातील पाणीसाठ्याने भरतीकडे प्रयाण केले आहे. कोयना धरणात १७.८३ टीएमसी पाणीसाठा झाला. नवजा येथे सर्वाधिक २४४ मीमी पावसाची नोंद झाली. कोयनानगर येथे १५६ मिमी तर महाबळेश्वर येथे १९७ मिमी पावसाची नोंद झाली. कोयना धरणाच्या पाणीसाठ्यात यामुळे चोवीस तासात तब्बल ३ टीएमसी पाणीसाठा वाढला आहे.