नवी दिल्ली: अमेरिकेची राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक आणि देशातील बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय शेअर बाजारात मंगळवारी मोठी उसळी दिसून आली. मंगळवारी सेन्सेक्स पहिल्यांदाच विक्रमी ४३ हजार अंशांच्या वर गेला. तसेच निफ्टीही १२,६०० अंशापर्यंत वर गेला. सेन्सेक्समध्ये ५०० पेक्षा जास्त अंशांनी वाढ झाली. बिहारमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीला पुर्ण बहूमत मिळण्याची चिन्हे आहेत. त्याचा बाजारावर सकारात्मक परिणाम होऊन सेन्सेक्स जवळपास १.५ टक्क्यांनी तर निफ्टी १ टक्क्याने वाढला.
सोमवारीही बाजारात तेजी
सोमवारीही तब्बल २०० सत्रांनंतर निफ्टीने विक्रमी उच्चांक गाठला होता. आठवड्याच्या पहिल्या सत्रात आतापर्यंत सेन्सेक्स ४२,४७३ पर्यंत तर निफ्टीनेही १२४३०.५० पर्यंत उसळी घेतली होती.
जागतिक घडामोडींचाही परिणाम
अमेरिकेच्या निवडणूक निकालानंतर जगभरातील शेअर मार्केटमध्ये आणि बाजारपेठांत मोठी उलथापालथ दिसत आहे. विशेष म्हणजे अमेरिकेत कोरोनाने कहर केला असून तिथे तिसरी लाट आल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. ज्यो बायडन यांच्या विजयानंतर जगभरातील शेअर मार्केटमध्ये वाढ झाल्याचे दिसत आहे. निक्केई २२५, हँगसेंग आणि मॉस्को एक्सचेंजमध्ये वाढ झाली आहे.
सीमांचलमध्ये ‘एआयएमआयएम’मुळे आघाडीला तोटा