28.3 C
Latur
Friday, June 25, 2021
Homeमहाराष्ट्रराज्यात विक्रमी रुग्णांनी केली कोरोनावर मात

राज्यात विक्रमी रुग्णांनी केली कोरोनावर मात

एकमत ऑनलाईन

मुंबई : राज्यात कोरोनाचा संसर्ग अद्यापही वाढतच आहे. दररोज मोठ्यासंख्येने करोनाबाधित आढळून येत असून, रूग्णांच्या मृत्यू संख्येतही भर पडतच आहे. मात्र एकीकडे ही परिस्थिती असताना दुसरीकडे कोरोनातून बरे होणा-यांची संख्यादेखील वाढत असल्याचे दिलासादायक चित्र पाहायला मिळत आहे. आज दिवसभरात राज्यात ८२ हजार २६६ रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत, तर ५३ हजार ६०५ नवीन कोरोनाबाधित आढळले असून, ८६४ रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे.

राज्यात आजपर्यंत एकूण ४३,४७,५९२ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ८६.०३ टक्के एवढे झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.४९ टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २,९१,९४,३३१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५०,५३,३३६ (१७.३१ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३७,५०,५०२ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २८,४५३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात एकूण ६,२८,२१३ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

भारतीय अमेरिकन डॉक्टरांकडून ५ हजार ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटरची मदत

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
202FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या