23.8 C
Latur
Friday, September 24, 2021
Homeमहाराष्ट्रसरकारला करायचीय सावकारांसारखी वसुली

सरकारला करायचीय सावकारांसारखी वसुली

एकमत ऑनलाईन

मुंबई : कोरोनामुळे एकीकडे शेतकरी असो की सामान्य नागरिक तो अडचणीत आहे. तो अडचणीत असताना त्यांना मदत करण्याऐवजी त्यांच्याकडून जबरदस्ती वसुली करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. यांना सावकारासारखी वसुली करायची आहे, म्हणून हे सगळे नाटक सुरू आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर केली. वीजबिल थकबाकीची वेळेवर वसुली झाली नाही, तर राज्य अंधारात जाऊ शकते, असे राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी म्हटलेआहे, या पार्श्वभूमीवर फडणवीसांनी हा निशाणा साधला.

ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी जे सांगितले, त्यातूनच हे लक्षात येते की, त्यांच्या काळात किती थकबाकी वाढली. पण ही जी काही थकबाकी आपण दाखवतो, याच्यामध्ये विशेषत: कृषिपंपाच्या संदर्भात आपण क्रॉस सबसिडी करतो. त्यानंतर जो काही आपला तोटा आहे, हा भरून काढण्यासाठी आपल्याला जे टेरिफ मिळते, त्यामधून हा तोटा भरून काढतो. त्यामुळे मला असे वाटते की, या ठिकाणी जबरदस्ती वसुली करण्यासाठी हा सगळा बाऊ तयार करण्यात येत आहे, असेही फडणवीस यांनी यावेळी बोलून दाखवले.

याचबरोबर नुकतीच पोटनिवडणुकीची घोषणा करण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर फडणवीस यांनी आता निवडणुका लागल्या आहेत, तर त्याला आम्ही सामोरे जाऊ, पण एकप्रकारे सरकार जे बोलते, ते सरकारच्या कृतीत कुठेदिसत नाही, हे यातून स्पष्ट झालेले आहे, असा आरोप केला. तसेच नाना पटोले जे बोलले, त्याचे उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिले पाहिजे, असे फडणवीस म्हणाले.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या