36.1 C
Latur
Saturday, April 17, 2021
Homeमहाराष्ट्रइंजिनिअरिंग परीक्षा स्थगितीस नकार; सुप्रीम कोर्टाने फेटाळली याचिका

इंजिनिअरिंग परीक्षा स्थगितीस नकार; सुप्रीम कोर्टाने फेटाळली याचिका

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : कोरोना व्हायरस महामारीच्या पार्श्वभूमीवर परीक्षांचे आयोजन होत असल्याने या परीक्षांना विरोध होत आहे. सर्वोच्च न्यायालयात नीट आणि जेईई मेन परीक्षांना हिरवा कंदिल दाखवल्यानंतरही जेईई मेन आणि नीट परीक्षा स्थगित करण्याची मागणी सातत्याने होते आहे. महाराष्ट्रातूनही इंजिनीअरिंग परीक्षा स्थगित करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. ही याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली.

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अशोक भूषण आणि आर. सुभाष रेड्डी यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. न्यायालयाने जेईई व एनईईटी परीक्षेसंदर्भात दिलेल्या निकालाचा हवाला देत याचिकाकर्त्यांना फटकारले. सर्वोच्च न्यायालयाने यासंदर्भात आदेश नुकतेच दिले आहेत, ते तुम्ही तपासून पाहायला हवे होते, असे न्यायालयाने म्हटले. आम्ही नीट आणि जेईई परीक्षा घेण्याची परवानगी दिली आहे, मग आता एका राज्यात परीक्षा घेण्याचे काम कसे थांबवणार? अशा शब्दात न्यायालयाने याबाबत असमर्थता व्यक्त करत याचिका फेटाळून लावली. जेईई मेन आणि नीट परीक्षा सप्टेंबर महिन्यात आयोजित केल्या जाणार आहेत. जेईई मेन परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना प्रवेश पत्रदेखील उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

यापूर्वीही फेटाळली होती याचिका
यापूर्वी १७ ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयाने जेईई मेन आणि नीट परीक्षा स्थगित करण्याची मागणी करणारी याचिका फेटाळली होती. परीक्षा नियोजित वेळेत आयोजित केल्या जातील, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते. सुनावणीच्या वेळी न्या. अरुण मिश्रा म्हणाले होते की शिक्षणासंबंधी निर्बंध आता उठवले पाहिजेत, कारण कोविड-१९ एक वर्ष आणखी राहू शकतो.

सुरक्षेच्या उपायांसह पुढे जाण्याचा काळ
परीक्षा स्थगित करण्याची आधीची याचिका फेटाळताना सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते की देशातील सर्व बाबी थांबवायच्या का? बहुमूल्य वर्ष का वाया घालवायचे? हा सुरक्षेच्या उपायांसह पुढे जाण्याचा काळ आहे. सर्व युक्तिवादांनंतर कोर्टाने जेईई मेन आणि नीट परीक्षा स्थगित करणारी याचिका फेटाळली होती.

व्हायरस फॅब्रिकच्या संपर्कात आल्यानंतर काही सेकंदातच नष्ट करण्यासाठी टेक्नोलॉजी

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,476FansLike
167FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या