27.4 C
Latur
Tuesday, November 29, 2022
Homeमहाराष्ट्रमुंबईत बुरखा घालण्यास नकार; पतीकडून पत्नीची हत्या

मुंबईत बुरखा घालण्यास नकार; पतीकडून पत्नीची हत्या

एकमत ऑनलाईन

मुंबई : बुरखा आणि हिजाब प्रकरणावरून देशात एकीकडे गदारोळ माजलेला असतानाच मुंबईतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. तीन वर्षांपूर्वी आंतरधर्मीय विवाह केलेल्या इक्बाल महमूद शेख नावाच्या तरूणाने त्याची पत्नी रुपालीची गळा चिरून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुस्लिम प्रथा न पाळल्यामुळे आणि बुरखा घालण्यास नकार दिल्याने ही हत्या करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. इक्बालच्या सततच्या त्रासाला रुपाली कंटाळली होती.

त्यामुळे तिने घटस्फोट मागितला होता. मात्र, त्यापूर्वीच इक्बालने रुपालीची हत्या केली. मुंबईतील चेंबूर परिसरात सोमवारी रात्री ही घटना घडली असून पोलिसांनी आरोपी इक्बालला अटक केली आहे. तीन वर्षांपूर्वी रुपालीचा विवाह इक्बाल शेख या तरुणाशी झाला होता. त्यानंतर दोघेही चेंबूर परिसरात असलेल्या इक्बालच्या घरी राहत होते. रुपाली हिंदू असल्याने आणि लग्नानंतरही ती मुस्लिम रितीरिवाज पाळत नसल्याने स्वत: इक्बाल आणि त्याचे कुटुंबीय त्याच्यावर नाराज होते. तसेच इक्बालचे कुटुंब रुपालीवर सातत्याने बुरखा घालण्यासाठी दबाव आणत होते. मात्र, त्यानंतरही रुपाली बुरखा परिधान करण्यास नकार देत होती. याच कारणावरून रुपाली आणि इक्बाल यांच्यात वाद होत होते. त्यामुळे दोघेही वेगळे राहत होते. या जोडप्याला एक मुलगाही आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या