31.8 C
Latur
Tuesday, May 11, 2021
Homeमहाराष्ट्ररेखा जरे हत्या प्रकरण; माध्यमे, सोशल मीडियाने जबाबदारीने वागावे

रेखा जरे हत्या प्रकरण; माध्यमे, सोशल मीडियाने जबाबदारीने वागावे

एकमत ऑनलाईन

नगर : यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या रेखा जरे यांच्या हत्या प्रकरणात माध्यमे आणि सोशल मीडियावर पोस्ट शेअर करणा-यांनी जबाबदारीने वागावे. मीडिया ट्रायल घेण्याचा प्रयत्न करू नये, अन्यथा कोर्टाला हस्तक्षेप करून आदेश द्यावा लागेल, अशी तंबी जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. आर. नातू यांनी शुक्रवारी दिली.

या प्रकरणातील मुख्य आरोपी पत्रकार बाळ ज. बोठे याच्या अटकपूर्व जामीन अर्जावर शुक्रवारी सुनावणी होती. पोलिसांकडून कागदपत्रे उशिरा आल्याने म्हणणे सादर करण्यासाठी मुदत द्यावी, अशी मागणी सरकारी वकिलांनी केली. सोबत पोलिसांनी बोठे याला स्वत: हजर करण्यात यावे, अशा विनंतीचा अर्जही केला आहे. हे कामकाज सुरू असताना न्यायाधीशांचे लक्ष कोर्टातील गर्दीकडे गेले. त्या अनुषंगाने न्यायाधीशांनी तंबी दिली. प्रसार माध्यमे, सोशल मीडियावर नेटक-यांनी व्यक्त होताना जपून लिहावे. मीडिया ट्रायल घेण्याचा प्रयत्न होता कामा नये, जर असे प्रकार घडले तर ते खपवून घेतले जाणार नाहीत. त्यांची दखल घेऊन योग्य ते आदेश दिले जातील, असेही कोर्टाने बजावले.

आरोपीचे वकील अ‍ॅड. महेश तवले यांनी काही कथित समाजसेवक या प्रकरणाबद्दल आणि कोर्टाबद्दलही सोशल मीडियात वेगवेगळ्या पोस्ट करीत असल्याचे कोर्टाच्या निदर्शनास आणून दिले. त्यावर कोर्टाने कुठे काही आक्षेपार्ह आढळून आले तर, त्याच्या प्रिंट काढून कोर्टात सादर करा, अशा सूचना तवले यांना दिल्या.

बोठेचा शोध सुरूच
दरम्यान, बोठे याचा कसून शोध घेतला जात असल्याची माहिती पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली. नगरसह अन्य ठिकाणी आतापर्यंत दहापेक्षा जास्त ठिकाणी पोलिसांनी शोध घेतला आहे. याशिवाय अन्य पुरावे मिळविण्याचेही प्रयत्न सुरू आहेत. विविध ठिकाणी घेण्यात आलेल्या झडतीमध्ये महत्त्वाचे पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहेत. मात्र, तपासाच्या दृष्टीने सर्वच माहिती उघड करणे शक्य होणार नाही.

ग.दि. माडगूळकर यांच्या नियोजित स्मारकाचे येत्या महिनाभरात भूमीपूजन

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,494FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या