कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे मातब्बर नेते माजी मंत्री आमदार हसन मुश्रीफ यांच्या तिन्ही मुलांच्या अटकपूर्ण जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलली आहे. तूर्तास मुश्रीफ यांच्या तिन्ही मुलांविरोधात कारवाई करणार नसल्याचे ईडीकडून सांगण्यात आले.
ईडीकडून मुश्रीफ यांच्याविरोधात ३५ कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर त्यांच्या तिन्ही मुलांनी अटकपूर्व जामिनासाठी मुंबई सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला आहे.