26.2 C
Latur
Thursday, August 11, 2022
Homeमहाराष्ट्र‘वैतरणा’ पुरात अडकलेल्या कामगारांची सुटका

‘वैतरणा’ पुरात अडकलेल्या कामगारांची सुटका

एकमत ऑनलाईन

पालघर : मुंबई-बडोदा महामार्गावर उड्डाणपुलाचे काम सुरू असताना अचानक वैतरणा नदीला पूर आल्याने १० कामगार येथे अडकून पडले होते. गेल्या १८ तासांपासून हे कामगार येथे अडकले होते. अखेर एनडीआरएफच्या मदतीने या सर्व कामगारांची सुखरूप सुटका करण्यात यश मिळाले आहे.

पालघर जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. काल दुपारनंतर वैतरणा नदीला पूर आला होता त्यावेळी या नदीवरील उड्डाणपुलाचे काम सुरू होते. त्यावेळी बार्जमध्ये काही कामगार काम करत होते. पण अचानक नदीला पूर आल्याने १० कामगार तिथे अडकून पडले होते.

एनडीआरएफच्या मदतीने गेल्या १८ तासांपासून त्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू होते. अखेर गुरुवारी सकाळी त्या १० कामगारांची सुखरूप सुटका करण्यात आली.

दरम्यान, रात्री देखील एनडीआरएफकडून या कामगारांना वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू होते पण अंधार असल्याने यामध्ये अडथळे येत होते, त्यामुळे बचाव मोहीम थांबवण्यात आली होती. पण सकाळी पुन्हा ही मोहीम सुरू करण्यात आली, या मोहिमेला गुरुवारी सकाळी यश आले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या