23.6 C
Latur
Tuesday, July 27, 2021
Homeमहाराष्ट्रपर्यटन उद्योगाला दिलासा, यापुढे औद्योगिक दराने कर आकारणी

पर्यटन उद्योगाला दिलासा, यापुढे औद्योगिक दराने कर आकारणी

एकमत ऑनलाईन

मुंबई, दि. १८(प्रतिनिधी) कोरोनाच्या संकटामुळे दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या पर्यटन उद्योगाला दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. आदरातिथ्य क्षेत्रावरील कारभार कमी करताना त्यांना आद्योगिक दराने कर आकारणी करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. यामुळे हाँटेल-रिसाँर्टवर १ एप्रिल २०२१पासून वीज, पाणी पट्टी, मालमत्ता व अन्य काही कर औद्योगिक दराने आकारण्यात येतील.

राज्यात आदरातिथ्य क्षेत्राला उद्योगाचा दर्जा देण्याचा निर्णय राज्य सरकारने यापूर्वी घेतला आहे. आता या क्षेत्राला औद्योगिक दराने कर आकारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे वाणिज्यिक दरांऐवजी औद्योगिक दराने कर आकारणी केली जाईल. त्याचा फायदा या क्षेत्राला होईल. या क्षेत्राला उद्योगाचा दर्जा मिळाल्याने पर्यटन प्रकल्प, हाँटेल, रिसाँर्टना वीज, बील, मालमत्ता कर, बिनशेती कर, पाणीपट्टीवर वाणिज्यिक दरांऐवजी आता औद्योगिक दराने आकारणी होणार असल्याने भांडवली खर्चात कपात होईल.

पर्यायाने हाँटेलचे दर कमी होऊन पर्यटकांना स्वस्त दरात हाँटेल उपलब्ध होतील. यामुळे पर्यटन व्यावसायिकांना नफा होईल. राज्यात हाँटेल, रिसाँर्टची संख्या वाढेल, गुंतवणूक वाढेल व रोजगार निर्मिती होईल. पर्यटन व्यवसायावर राज्यात ४० लाख लोकांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होते तर त्यावर सुमारे दीड कोटी लोक अवलंबून आहेत. या सर्वांनाच या निर्णयाचा फायदा होईल.

सर्व सोयी-सुविधांनी युक्त सुंदर वसाहत निर्माण करावी

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
199FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या