24.4 C
Latur
Thursday, August 18, 2022
Homeमहाराष्ट्रमहाबळेश्वरमधील बिटिशकालीन सर्व पॉईंटची नावे बदला

महाबळेश्वरमधील बिटिशकालीन सर्व पॉईंटची नावे बदला

एकमत ऑनलाईन

भाजप आणि हिंदू एकता आंदोलन समितीचं तहसीलदारांना पत्र
महाबळेश्वर : थंडगार हवेचे ठिकाण म्हणून ओळख असलेल्या महाबळेश्वरचे वातावरण आता तापणार की काय अस प्रश्न सध्या पडला आहे. त्याचे कारण महाबळेश्वरातील पॉईंटला देण्यात आलेली इंग्रज अधिका-यांची नावे तातडीने बदलावी आणि या सर्व पॉईंटला क्रांतिकारकांची नावे द्यावीत, अशी मागणी हिंदू एकता आंदोलन समिती आणि भाजपच्या वतीने करण्यात आली आहे. भाजप आणि हिंदू एकता आंदोलन समितीने याबाबत महाबळेश्वरच्या तहसीलदारांना पत्र लिहिलं आहे.

नाव बदलण्यासाठी १५ ऑगस्टपर्यंत अल्टिमेटम देण्यात आला आहे. १५ ऑगस्टपर्यंत या सगळ्या पॉईंटला क्रांतिकारकांची नावे द्या अन्यथा आम्ही नावे बदलू असा इशारा देण्यात आला आहे.

महाबळेश्वरमधील पॉईंटची नावे
ऑर्थरसिट, वल्सिन पॉईंट, लॉडविक पॉईंट, लेस्ली वल्सिन पॉईंट, केटस् पॉईंट, एलिफन्ट हेड, निडल होल पॉईंट, बेबींन्टन पॉईंट, इको पॉईंट, बॉम्बे पॉईंट, लिंग मळा वॉटर फॉल पॉईंट, किंग चेअर पॉईंट, विंडो पॉईंट, हन्टिंग पॉईंट, टायगर स्प्रिंग पॉईंट, कॅसल रॉक पॉईंट, मंकी पाईंट पॉईंट, मरजोरी पॉईंट, कॅटस पॉईंट, मिडल पॉईंट, सनसेट पॉईंट, प्लॅटो पॉईंट, वेण्णालेक पॉईंट, पारसी पॉईंट

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या