30.6 C
Latur
Friday, May 14, 2021
Homeमहाराष्ट्रस्फोटकांचा तपास करणा-या अधिका-याची बदली

स्फोटकांचा तपास करणा-या अधिका-याची बदली

एकमत ऑनलाईन

मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर आढळलेल्या स्फोटकांप्रकरणी राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) चौकशी करत असून या तपास पथकाचे नेतृत्व करत असलेले महानिरीक्षक अनिल शुक्ला यांची तडकाफडकी बदली करण्यात आल्याचे वृत्त आहे. अनिल शुक्ला यांची मिझोरामला बदली करून त्यांच्याजागी ज्ञानेंद्र वर्मा यांच्याकडे सूत्रे सोपवण्यात आली आहेत. दरम्यान, राज्याचे ग्रामविकास मंत्री व राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांनी या बदलीवरून केंद्र सरकारवर गंभीर आरोप केला आहे.

ही बदली नियमानुसार झाल्याचा भाजपचा दावा आहे. मात्र, राष्ट्रवादी कॉंग्रेसने याबद्दल साशंकता व्यक्त केली असून, या प्रकरणात मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांचाही कुठेतरी सहभाग असल्याचे समोर येत असल्यानेच शुक्ला यांची तडकाफडकी बदली केल्याचा गंभीर आरोप केला आहे. मंत्री हसन मुश्रिफ यांना हा आरोप केला. एवढे गंभीर प्रकरण असताना तपास अधिका-याची तडकाफडकी बदली करण्याचे कारण काय, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

अँटिलिया निवासस्थानाबाहेर स्कॉर्पिओ कारमध्ये आढळलेली स्फोटके आणि स्कॉर्पिओ मालक मनसुख हिरेन हत्येप्रकरणी एनआयएमार्फत तपास सुरू आहे. याप्रकरणी एनआयएने मुंबई पोलिस दलातील सहायक पोलिस निरीक्षक म्हणून सेवेत राहिलेले व सध्या निलंबित असलेले सचिन वाझे यांना अटक केली आहे. या प्रकरणी तपासाला वेग आला असून वाझे यांचे सहकारी रियाज काझी यांनाही अटक करण्यात आली आहे. दुसरीकडे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांचा जबाब नोंदवून घेण्यात आला आहे तर निवृत्त पोलिस अधिकारी प्रदीप शर्मा यांच्यावरही एनआयए टीमकडून प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली आहे.

हा तपास सध्या अत्यंत महत्त्वाच्या वळणावर असतानाच अनिल शुक्ला यांच्या बदलीचे वृत्त येत असल्याने अनेक प्रश्न उपस्थित होवू लागले आहेत. अनिल शुक्ला यांची मिझोराममध्ये बदली करण्यात आली आहे. अनिल शुक्ला हे मिझोराम केडरचे १९९८ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. त्यांना महाराष्ट्रात प्रतिनियुक्तीवर पाठवण्यात आले होते. प्रतिनियुक्तीचा कार्यकाळ संपल्यानंतर नियमानुसारच त्यांची बदली करण्यात आली आहे, असेही सांगण्यात येत आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसने मात्र या बदलीवर संशय घेतला आहे.

राज्यातील न्यायालये रविवारपर्यंत बंद

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,495FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या