31.3 C
Latur
Saturday, May 8, 2021
Homeमहाराष्ट्रदुसऱ्यांदा होणारा कोरोना हा अधिक गंभीर व धोकादायक

दुसऱ्यांदा होणारा कोरोना हा अधिक गंभीर व धोकादायक

एकमत ऑनलाईन

मुंबई : जगभरात कोरोनाचा कहर सुरू असताना भारतातही कोरोनाची लागण होण्याचं प्रमाण प्रचंड वाढलं आहे. भारतात आतापर्यंत 56 लाख लोक कोरोनाबाधित झाले असून, 90 हजार जणांना प्राण गमवावे लागले आहेत. दरम्यान कोरोनाच्या बाबतीत आणखी एक गंभीर प्रकार समोर येत आहे. आता काहींना कोरोनाची दुसऱ्यांदा लागण होत असल्याची काही प्रकरणे समोर येत आहेत. मेडिकल जर्नल ‘द लांसेट’ मधील संशोधनानुसार मुंबईतील चार आरोग्य कर्मचाऱ्यांना पुन्हा कोरोनाची लागण झाली आहे, पण त्यांची प्रकृती या वेळी अधिक गंभीर आहे. त्यामुळे दुसऱ्यांदा होणारा कोरोना हा अधिक गंभीर व धोकादायक असल्याचं या संशोधनातून सिद्ध झालं आहे.

जुसऱ्यांदा कोरोनाबाधित झालेल्या चार कर्मचाऱ्यांपैकी तीन मुंबई महानगपालिकेच्या नायर रुग्णालयात काम करतात तर एक कर्मचारी हिंदुजा रुग्णालायत कार्यरत आहे. या चौघांना दुसऱ्यांदा कोरोना झाला. आरटी पीसीआर तपासणीत यांना कोरोना झाल्याचं निदान झालं नव्हतं. त्यासाठी वेगळी चाचणी करावी लागली. दोन्ही रुग्णालयांच्या सहकार्याने इंस्‍टिट्यूट ऑफ जिनोमिक्‍स अँड इंट्रिगेटिव्ह बॉयॉलॉजी आणि दिल्‍लीच्या इंटरनॅशनल सेंटर फॉर जेनेटिक इंजिनीयरिंग अँड बायोटेक्‍नोलॉजी (ICGEB) यांनी एकत्रित यावर संशोधन केलं आहे. यात 8 जीनोमध्ये 39 म्‍यूटेशन आढळले.

ज्या चौघा आरोग्य कर्मचाऱ्यांना पुन्हा बाधा झाली असून त्यांची प्रकृती आधीपेक्षा अधिक गंभीर असल्याचे नायर हॉस्पिटलच्या डॉ. जयंती शास्री आणि ICGEB च्या डॉ. सुजाता सुनील यांनी म्हटले आहे. चौघांची स्थिती नाजूक आहे, या विषाणूंची दुसऱ्यांदा बाधा झाल्यानंतर अधिक गंभीर आणि तीव्र लक्षणं आढळून येतात असंही त्यांनी नमूद केलं. चौघा कर्मचाऱ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

डॉक्टरांच्या मते आरटी पीसीआर तपासणीत कोरोना व्हायरसचे दुसऱ्यांदा झालेले संक्रमण समोर येत नाही. जिनोम सिक्वेसिंगच्या माध्यमातूनच दुसऱ्यांदा कोरोना झाला आहे, की नाही याचे निदान होऊ शकते. महत्त्वाचं म्हणजे दुसऱ्यांदा कोरोना झाल्यानंतरही चौघांना लक्षणं तीव्र असली तरी रेस्पिरेटरी ट्रॅरमध्ये त्यांना त्रास जाणवला नाही. ही बाब खरोखरच चांगली आहे, असं डॉक्टरांचं मत आहे. जनसामान्यांमध्ये कोरोना विषाणूच्या संसर्गाबाबत जागृती करण्यासाठी हे संशोधन करण्यात आलं आहे. या संशोधनाच्या निष्कर्षांतून लोक धडा घेतील आणि अधिक सुरक्षितता बाळगतील अशी अपेक्षा आहे.

पोलीस अधिकाऱ्याकडे आढळली 70 कोटींची बेकायदेशीर संपत्ती

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,493FansLike
182FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या