27.4 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeमहाराष्ट्रऔरंगाबाद, उस्मानाबाद आणि नवी मुंबई विमानतळ नामांतराचा ठराव मंजूर

औरंगाबाद, उस्मानाबाद आणि नवी मुंबई विमानतळ नामांतराचा ठराव मंजूर

एकमत ऑनलाईन

मुंबई : औरंगाबाद, उस्मानाबाद आणि नवी मुंबई यांच्या नामांतराचा ठराव मंजूर झाला आहे.
औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजीनगर तर उस्मानाबादचे नाव धारशिव तर मुंबई विमानतळाचे नाव दि. बा. पाटील या नावांना मंजूरी मिळाली आहे. आज पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे. त्यातच आज महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. औरंगाबाद, उस्मानाबाद आणि नवी मुंबई यांच्या नामांतराचा ठराव मंजूर झाला आहे. औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजीनगर तर उस्मानाबादचे नाव धारशिव तर मुंबई विमानतळाचे नाव दि. बा. पाटील या नावांना मंजूरी मिळाली आहे. विधानसभेत तीन प्रस्ताव मंजूर त्यामध्ये औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजी नगर करण्यात आले आहे.

त्याचबरोबर उस्मानाबादचे नाव धारशिव करण्यात आले आहे. तर नवी मुंबईतील विमानतळाचे नाव दि. बा. पाटील असं नामकरण करण्याचा ठराव सभागृहात मंजूर करण्यात आला आहे. हा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला आहे. मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत नमूद केल्याप्रमाणे या अगोदर १९९८ साली उस्मानाबाद जिल्ह्याचे नामांतर धारशिव करण्यात आले होते. हा निर्णय शासनाने २००१ साली रद्द केला.

त्यामुळे राज्य शासनाने घेतलेला नामांतराचा निर्णय हा फक्त राजकीय हेतूने घेतलेला निर्णय असल्याचा दावा याचिकाकर्ते यांनी केला होता. तसेच हा निर्णय केंद्र शासनाच्या मार्गदर्शक तत्वाच्या विरोधात आहे. फक्त राज्यामध्ये सत्तांतर झाले म्हणून असे नामांतरचे निर्णय घेता येणार नाही. नामांतराचा निर्णय हा संविधानाच्या मूलभूत तत्वाच्या विरोधात आहे असेही याचिकेत नमुद करण्यात आले होते. त्यामुळे उस्मानाबाद जिल्ह्याचे नामांतर धाराशिव करण्याचा निर्णय रद्द करण्याची मागणी या याचिकेतून करण्यात आली होती. तसेच त्यास अंतरिम स्थगिती द्यावी अशीही मागणी केली गेली होती.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या