ऑगस्ट महिन्यात कोरोना लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीला सुरुवात होईल
पुणे : भारत देशात कोरोना प्रतिबंधक लस ही खाजगी संस्थांच्या मार्फत न देता सरकारच्या मार्फत मोफत देण्यात येईल अशी माहिती सिरम इन्स्टिट्यूटचे सीईओ आदर पुनावाला यांनी दिली आहे.
लसनिर्मिती करणारी जगातील सर्वात मोठी कंपनी म्हणून सिरम इन्स्टिट्यूटला ओळखले जाते. आदर पुनावाला यांनी ट्विट करत पारसी समाजासाठी गरजेपेक्षा जास्त लस ठेवण्यासंबधी बोलताना ही माहिती दिली आहे.
या संबधीत वृत्त हिंदुस्तान टाइम्सने दिले आहे. आदर पुनावाला म्हणाले की, दोन पारसींमधील हे एक मैत्रीपूर्ण संभाषण होते. एकदा लस तयार झाली की सर्वांसाठी ती उपलब्ध असेल. पन त्यासंबधी आताच काही बोलणे घाईचे ठरेल.
कोरोना लसीच्या उत्पादनासाठी ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीने आणि Astrazeneca यांच्याकडून सिरम इन्स्टिट्यूटची निवड करण्यात आली आहे. लस खरेदीबाबत आदर पुनावाला यांनी याआधीही थोडीफार माहिती दिली होती.
ऑगस्ट महिन्यात कोरोना लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीला सुरुवात होईल अशी माहिती आदर पुनावाला यांनी दिली आहे. राष्ट्रीय औषध नियंत्रण प्राधिकरणाकडे आपण देशात दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील मानवी चाचणीसाठी परवानगी मिळण्यासाठी अर्ज केला आहे.
मुंबई आणि पुण्यात रुग्णसंख्या जास्त असल्याने याच ठिकाणी चाचणी करण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे. जेणेकरून लस किती प्रभावी आहे हे लक्षात येईल. अशी माहिती सिरम इन्स्टिट्यूटने दिली आहे.
Read More सोयाबीनवर चक्री भुंग्याचा प्रादुर्भाव