23.7 C
Latur
Thursday, August 11, 2022
Homeमहाराष्ट्रकाल, आज, उद्याही एकनाथ शिंदे आदरणीय

काल, आज, उद्याही एकनाथ शिंदे आदरणीय

एकमत ऑनलाईन

मुंबई :  माननीय एकनाथ शिंदे साहेब कालही आदरणीय होते, आजही आदरणीय आहेत आणि उद्याही राहतील. पण वाचाळवीरांनी उगाच कळ काढू नये, असा थेट इशारा दीपाली सय्यद यांनी ट्विट करत भाजपला दिला आहे.

एकनाथ शिंदे यांनी ३० जून रोजी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर ४ जुलै रोजी विशेष अधिवेशनामध्ये विश्वासदर्शक ठराव जिंकला. त्यानंतर राज्यातील राजकारणाला नवे वळण मिळाले. दरम्यान, दीपाली सय्यद यांनी ट्विट करत भाजपवर निशाणा साधला आहे. तसेच त्यांनी किरीट सोमय्यांवर हल्ला चढवला आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुलाच्या, पत्नीच्या नावे लबाड्या केल्या. तेच लोक हे ईडीचं सरकार असल्याचं म्हणतात. असे वक्तव्य किरीट सोमय्यांनी माध्यमांशी बोलताना केले. सोमय्यांच्या या वक्तव्यानंतर दीपाली सय्यदने ट्विट करत हल्लाबोल केला आहे.

मला माननीय एकनाथ शिंदे साहेब कालही आदरणीय होते, आजही आदरणीय आहेत आणि उद्याही राहतील. पण किरीट सोमय्या आणि भाजपचे अन्य वाचाळवीर आदरणीय उद्धव साहेब व शिवसेनेवर टीका करतील कर त्यांना एवढोच सांगणे आहे की, आमच्यातील शिवसेना आजही जिवंत आहे. उगाच कळ काढू नका. आदरणीय शिंदे साहेबांनी भाजपवर दाखवलेल्या विश्वासाला तडा देऊ नका. असा सल्लाही दीपाली सय्यद यांनी दिला.

तसेच भाजप आमचा शत्रू नाही आणि त्यांच्याविरुद्ध बोलण्यास आम्हाला आनंदही नाही. परंतु वाचाळवीरांना माफी मिळणार नाही. भविष्यात काय होईल माहीत नाही पण भाजपने याची दखल घेणे गरजेचे आहे, असे दीपाली सय्यद यांनी म्हटले आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या