30.6 C
Latur
Friday, May 14, 2021
Homeमहाराष्ट्रविकेन्ड लॉकडाऊनला प्रतिसाद

विकेन्ड लॉकडाऊनला प्रतिसाद

एकमत ऑनलाईन

मुंबई : महाराष्ट्रात कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारपासून वीकेंड लॉकडाऊन लावण्यात आला आहे. शुक्रवारी रात्रीपासून सोमवारी सकाळपर्यंत हा लॉकडाऊन आहे. या विकेन्ड लॉकडाऊनला राज्यात सर्वत्र चांगला प्रतिसाद मिळाला. अगोदरच राज्यात सर्वत्र कडक निर्बंध लावले आहेत. त्यामुळे व्यवहार ठप्प आहेतच. मात्र, दोन दिवस लॉकडाऊनच लागू करण्यात आल्याने शनिवारी राज्यात सर्वत्र कडेकोट बंदसारखी स्थिती होती. सर्व बाजारपेठा आणि वाहतूकही बंद राहिली. त्यामुळे बाजारपेठा ओस, रस्त्यांवरही शुकशुकाट पाहायला मिळाला.

राज्यात कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन लावण्याचे संकेत देण्यात आले असले, तरी या अगोदर राज्य सरकारने राज्यात सर्वत्र कडक निर्बंध आणि विकेन्डला दोन दिवस लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेतला. शनिवारी लॉकडाऊनचा पहिला दिवस होता. त्यातच राज्य सरकारच्या निर्णयाला व्यापा-यांमधून विरोध होत होता. त्यामुळे प्रतिसाद कसा मिळणार, याबद्दल साशंकता होती. मात्र, राज्यात सर्वच शहरांत नागरिकांनी प्रतिसाद दिला. त्यामुळे सर्वत्र शुकशुकाट पाहायला मिळाला.

अत्यावश्यक कामाशिवाय नागरिकही बाहेर पडले नाहीत. हा लॉकडाऊन ३० एप्रिलपर्यंत दर शनिवारी आणि रविवारी असेल. मुंबईसह महाराष्ट्रातील सर्वच शहर परिसरात शनिवारी शुकशुकाट पाहायला मिळाला. राज्यात सर्वत्र कोरोनाचा कहर सुरू आहे. त्यामुळे चिंता वाढली असून, कोरोनाची साखळी तोडण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे मुंबई, पुण्यासह पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, कोकणातही विकेन्ड लॉकडाऊनला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला.

२४ तास धावणा-या मुंबईलाही ब्रेक
विकेन्ड लॉकडाऊनमुळे मुंबईतही शुकशुकाट पाहायला मिळाला. अर्थात, २४ तास धावणा-या मुंबईला ब्रेक लागला आहे. लॉकडाऊनमुळे रस्त्यांवर आणि समुद्र किना-यावर चिटपाखरूही दिसले नाही. सर्वत्र फक्त पोलिसांचा कडक बंदोबस्त पाहायला मिळाला. विशेष मुंबईत लोकलही रिकाम्याच फिरताना दिसल्या. बस, टॅक्सीदेखील रिकाम्याच धावत होत्या. मुंबईतील नेहमी गर्दी असलेल्या दादर, माटुंगा, अंधेरी, ग्रांट रोड, वर्ली, कुर्ला, भिंडी बाजार, घाटकोपर आणि मशीद बंदरसारख्या परिसरातही तुरळक लोक दिसत होते. या परिसरात विनाकारण फिरणा-यांंकडून दंड वसुली करण्यात आली.

उस्मानाबादेत मृत्यूचे तांडव; एकाच ठिकाणी ८ मृतदेहांवर पालिकेकडून अंत्यसंस्कार

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,495FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या