22.7 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeमहाराष्ट्रवसंत मोरेंवर बारामतीची जबाबदारी

वसंत मोरेंवर बारामतीची जबाबदारी

एकमत ऑनलाईन

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आता येत्या काळात पार पडणा-या निवडणुकांसाठी मोर्चे बांधणी सुरु केली आहे. पुण्यात यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. पवार कुटुंबियांचा बालेकिल्ला असलेल्या बारामतीवर मनसेने लक्ष केंद्रीत केले असून बारामती लोकसभेची जबाबदारी वसंत मोरेंवर सोपवण्यात आली आहे. राज ठाकरेंनी मशीदीवरील भोंग्यांचा मुद्द्याला हात घातल्यानंतर यावर वसंत मोरे नाराज होते. पण आता त्याच मोरेंवर मनसेने महत्वाची जबाबदारी सोपवली आहे.

मनसेच्या प्रमुख पदाधिका-यांची बैठक आज मुंबईत पार पडली. या बैठकीत मोरेंवरील जबाबदारीबाबत निर्णय झाला. या निर्णयानुसार, मनसे नेते वसंत मोरे यांना बारामती लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. खुद्द मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिली वसंत मोरेंना ही नवीन जबाबदारी दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून वसंत मोरे हे पक्षाच्या कार्यक्रमात सक्रिय भाग घेत नसल्याचे दिसत होते. पण आता नाराज असलेले मोरे यांना थेट सुप्रिया सुळे यांच्या मतदार संघाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या