21.4 C
Latur
Tuesday, July 27, 2021
Homeमहाराष्ट्रमुंबईसह १० जिल्ह्यातील निर्बंध कायम, २४ जिल्ह्यांना दिलासा मिळणार, रायगड, रत्नागिरी व...

मुंबईसह १० जिल्ह्यातील निर्बंध कायम, २४ जिल्ह्यांना दिलासा मिळणार, रायगड, रत्नागिरी व कोल्हापूर अजूनही चौथ्या वर्गात

एकमत ऑनलाईन

मुंबई,दि.१८ (प्रतिनिधी) राज्यातील कोरोनाची स्थिती नियंत्रणात आली असली तरी १० जिल्ह्यांचा संसर्ग दर अजूनही अधिक असल्याने तेथील निर्बंध तूर्त कायम राहण्याची शक्यता आहे. तर विदर्भ, उत्तर महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांसह २४ जिल्ह्यातील संसर्ग दर ५ टक्क्यांपेक्षा कमी व ऑक्सिजन खाटांची पुरेशी उपलब्धता असल्याने तेथील निर्बंध शिथिल होणार आहेत. मुंबईचा संसर्गदर कमी झाला असला तरीही मुंबई अजून तिसऱ्या गटात असल्याने सध्याचे निर्बंध कायम राहणार आहेत.

राज्य सरकारने निर्बंधाबाबतचे निकष निश्चित केले असून संसर्ग दर व ऑक्सिजन बेड च्या उपलब्धतेनुसार त्यांचे वर्ग ठरवून दिले आहेत. त्यानुसार २४ जिल्ह्यातील संसर्गदर ५ टक्क्यांपेक्षा कमी, ऑक्सिजन बेडची उपलब्धता ७५ टक्के असल्याने हे जिल्हे पहिल्या वर्गात आले आहेत. त्यामुळे शहरातील दुकाने पूर्णवेळ सुरू राहू शकतील. याशिवाय मॉल्स, थिएटर्स, मल्टिप्लेक्स, नाट्यगृहे यांना सुरू करण्यास परवानगी मिळू शकते. मात्र याबाबतचा अंतिम निर्णय स्थानिक प्रशासनावर अवलंबून असेल. अहमदनगर, अकोला, अमरावती, औरंगाबाद, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, गोंदिया, हिंगोली, जळगाव, जालना, लातूर, नागपूर, नांदेड, नंदुरबार, नाशिक, परभणी, सोलापूर, ठाणे, वर्धा, वाशिम, व यवतमाळ हे जिल्हे या वर्गात आहेत.

१० जिल्ह्यातील संसर्ग दर जास्त
राज्य सरकारने शुक्रवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार बीड, कोल्हापूर, उस्मानाबाद, पालघर, पुणे ग्रामीण, रायगड, रत्नागिरी, सांगली, सातारा आणि सिंधुदुर्ग या १० जिल्ह्यातील कोरोना संसर्गाचा दर ५ टक्क्यांपेक्षा जास्त आहे. मुंबईचा पॉझिटीव्हीटी ३.७९ टक्के झाला आहे. परंतु अजूनही मुंबईत रोज ६०० ते ७०० कोरोना रुग्ण नव्याने आढळत आहेत. तसेच सक्रिय रुग्णांची संख्या अधिक आहे. त्यामुळे मुंबईतील निर्बंध तुर्त कायम ठेवण्यात येणार आहेत.

अन्य वस्तूंच्या दरवाढीचे काय?

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
199FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या