21.4 C
Latur
Tuesday, July 27, 2021
Homeमहाराष्ट्रलसींचे दोन डोस घेतलेल्यांसाठी निर्बंध शिथिल करणार

लसींचे दोन डोस घेतलेल्यांसाठी निर्बंध शिथिल करणार

एकमत ऑनलाईन

मुंबई, दि. २१ (प्रतिनिधी) लसीचे दोन डोस घेतलेल्या विमान प्रवाशांसाठी आरटीपीसीआर चाचणीचे बंधन शिथिल करण्यात आले आहे. त्याच धर्तीवर दोन डोस घेतलेल्यांना लोकल प्रवास व अन्य काही निर्बंधांमधून सूट देण्याची मागणी आहे.टास्क फोर्सचे मत घेऊन याबाबत निर्णय घेतला जाईल, असे सुतोवाच आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज केले. तर या संदर्भात आपण उद्या मुख्यमंत्र्यांसमवेत चर्चा करणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. पुढील काही काळ सर्वांनी निर्बंधांचे काटेकोरपणे पालन केले तर कोरोनाची तिसरी लाट रोखणे शक्य असल्याचे टोपे यांनी सांगितले.

तिसऱ्या लाटेच्या सावटमुळे राज्यात असलेल्या निर्बंधांना विरोध होत असून हे निर्बंध शिथिल करण्यासाठी सरकारवरील दबाब वाढत चालला आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांसाठी निर्बंध शिथिल करण्याची गरज असल्याचे सांगितले. टप्प्याटप्प्याने आपण निर्बंधामध्ये सुट देत आहोत.पूर्वी मुंबई विमानतळावर येणाऱ्या प्रवाशांना चोवीस तास अगोदरचा कोरोना चाचणी अहवाल बंधनकारक होता. पण आता दोन लस घेतलेल्यांना यातून मुभा देण्यात आली आहे. कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतले असतील तर आता अनेक निर्बंध शिथिल करायला पाहिजेत याबाबत कोणाचेही दुमत नसल्याचे टोपे यांनी स्पष्ट केले. लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या मुंबईकरांना लोकल प्रवासाची परवानगी द्यावी अशी मागणी आहे. लोकलने रोज लाखो लोक प्रवास करतातयेवढ्या गर्दीत प्रवाशांची तपासनी करता येईल का ? रेल्वेजवळ तेवढं मनुष्यबळ आहे का ? असे प्रश्न आहेत. त्यामुळेच अद्याप लोकलबाबत निर्णय झाला नसेल. मात्र दोन लस घेतल्या असतील तर निर्बंध शिथिल करायला हवेत. याबाबत कोणाचेही दुमत नाही. मुख्यमंत्री आणि टाक्स फोर्स योग्य निर्णय घेतील, असे टोपे यांनी सांगितले.

तिसरी लाट थोपवता येणे शक्य
जर आपण करोनाचे नियम व्यवस्थित पाळले तर आपल्याला करोनाची तिसरी लाट थोपवता येऊ शकते. तिसरी लाट कधी येणार? किती गंभीर असणार ? हे आपल्यावर अवलंबून आहे. आयसीएमआरने काही नियम आखून दिले आहेत व त्या नियमानुसारच महाराष्ट्र काम करत आहे. नुकतीच केंद्राची टिम राज्यात येऊन गेली. त्यांनी निर्बंध पाळणे, टेस्टींग वाढवण्याच्या सुचना दिल्या आहेत. निर्बंध कमी करायचे असतील तर लसीकरणाचा वेग वाढवावा लागेल. दोन महिन्यात राज्याचे १०० टक्के लसीकरण करण्याची क्षमता महाराष्ट्रात आहे. पण त्या गतीनं लस उपलब्ध होणे आवश्यक आहे. ६० ते ७० टक्के लोकांचे लसीकरण पूर्ण झाल्यानंतर सामूहिक प्रतिकारशक्ती निर्माण होईल व मोठा दिलासा मिळेल असे टोपे यांनी सांगितले.

निर्बंधांबाबत शुक्रवारी मुख्यमंत्र्यांशी चर्चा-अजित पवार
लसीचे दोन डोस घेतलेल्यांवरील निर्बंध शिथिल करून त्यांना हळूहळू बाहेर पडण्याची परवानगी दिली पाहिजे असे आपले मत आहे. यासंदर्भात आपण मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याशी बोलणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

डिजिटल इंडिया : ज्ञान हीच शक्ती!

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
199FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या