21.1 C
Latur
Tuesday, September 28, 2021
Homeमहाराष्ट्रराज्‍यात निर्बंध अधिक कडक करणार - राजेश टोपे

राज्‍यात निर्बंध अधिक कडक करणार – राजेश टोपे

एकमत ऑनलाईन

मुंबई,दि.३१ (प्रतिनिधी)-राज्‍यात लॉकडाउन करण्याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. मात्र आहेत ते निर्बंध अधिक कडक करण्याच्या दृष्‍टीने राज्‍य सरकार पावले उचलणार आहे. कोरोनाग्रस्‍तांची संख्या जर अशीच वाढत गेली आणि लोक जर अशाच बेफिकिरीने वागणार असतील तर निर्बंधात कठोरता आणावीच लागेल. लवकरच याबाबतचे नोटिफिकेशन काढण्यात येईल असे आरोग्‍यमंत्री राजेश टोपे यांनी आज सांगितले.मुंबई किंवा राज्‍यात बेडसची कोणतीही कमतरता नाही अशी ग्‍वाही देखील त्‍यांनी दिली.

राज्‍यात लॉकडाउनबाबत विविध चर्चा सुरू आहेत.या पार्श्वभूमीवर राजेश टोपे यांनी संभ्रम दूर करताना सांगितले की, लॉकडाउनच्या बाबतीत अदयाप तरी निर्णय झालेला नाही.मात्र निर्बंध अधिक कठोर करण्यात येणार आहेत.गर्दी टाळावी हाच यामागचा उददेश आहे.जनतेने देखील त्‍याची मानसिकता ठेवली पाहिजे.गर्दी जिथे होते अशा सर्व ठिकाणी हे निर्बंध लावले जाणार आहेत.त्‍याबाबतचे नोटिफिकेशन लवकरच काढण्यात येईल असेही ते म्‍हणाले.

बेडसची कमतरता नाही
मुंबई किंवा राज्‍यात कोणत्‍याही प्रकारच्या बेडसची कमतरता नाही.मुंबईत ४०० आयसीयू बेड उपलब्‍ध आहेत.ऑक्‍सीजन,व्हेंटीलेटर बेडही उपलब्‍ध आहेत.राज्‍यातल्‍या इतर जिल्‍हयांतही बेड उपलब्‍ध आहेत.एखाद दुस-या रूग्‍णालयात जिथे जास्‍त मागणी असते अशा ठिकाणी कदाचित बेड उपलब्‍ध नसल्‍याचे प्रकार घडलेले असू शकतात.पण राज्‍यात अशी स्‍थिती नाही.बेडस वाढविण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आलेल्‍या आहेत.एकूण ऑक्‍सीजनपैकी ८० टक्‍के ऑक्‍सीजन वैदयकिय वापरासाठी तर २० टक्‍के उदयोगांसाठी असे प्रमाण निश्चित करण्यात आले आहे.रूग्‍णालयांना येणा-या इतर अडचणी देखील दूर करण्यात आलेल्‍या आहेत असेही टोपे म्‍हणाले.

लसीकरण वेगाने सुरू
राज्‍यात लसीकरणही वेगाने सुरू आहे.जनतेने देखील पुढे येउन लसीकरण करून घेतले पाहिजे.हर्ड इम्‍युनिटी आणण्याचा उददेश त्‍यातून साध्य होउ शकतो.लसीकरणामुळे येत्‍या काळात रूग्‍णांची संख्या निश्चितच कमी झालेली पहायला मिळेल असा विश्वासही टोपे यांनी व्यक्‍त केला.

शरद पवार यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया, प्रकृती उत्तम

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
194FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या