22.4 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeमहाराष्ट्ररिक्षा चालक कोरोना रुग्णाला तब्बल १८ लाखांचे बिल!

रिक्षा चालक कोरोना रुग्णाला तब्बल १८ लाखांचे बिल!

एकमत ऑनलाईन

किरीट सोमय्यांनी उघडकीस आणला रुग्णालयाच्या लुटमारीचा प्रकार!

मुंबई : देशासह अनेक राज्यातील शहरांमध्ये कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. लॉकडाउनमुळे नियंत्रण असलेला करोनाचा प्रसार शिथिलतेनंतर वाढताना दिसून येत आहे. त्यात कोरोना व्हायरसची लागण झाल्यानंतर खासगी रुग्णालयात उपचार घेणे सर्वसामान्यांना परवडत नाही. मुंबईसह महाराष्ट्रात कोरोना बाधितांवर उपचार करणाऱ्या खासगी रुग्णालयांकडून अव्वाच्या सव्वा बिल आकारली जात आहेत. हाच मुद्दा पकडून भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.

Read More  श्रीराममंदीर भूमिपूजन : राष्ट्रवादीच्या नेत्यांची मुख्यमंत्र्यांना तंबी !

खासदार किरीट सोमय्या यांनी एक ट्विट केल आहे. किरीट सोमय्या यांनी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि महापालिका आयुक्तांना पत्र पाठवून पत्रात एका रुग्णाच्या नातेवाईकाला १८ लाख रुपये बिल आकारण्यात आल्याचे उदहारण दिले आहे. त्याशिवाय रिक्षावाला, छोटया व्यापाऱ्याला लाखो रुपयाचे बिल आकारण्यात आल्याचे उदहारणही त्यांनी दिले आहे. यांनी आपल्या टि्वटमध्ये विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना टॅग केले आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या