28.1 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeमहाराष्ट्रपुण्यात रिक्षा भाडे वाढले

पुण्यात रिक्षा भाडे वाढले

एकमत ऑनलाईन

पुणे : पुणे रिक्षा चालकांनी केलेल्या मागणीमुळे प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने रिक्षा चालकांची भाडेवाढ करण्यासंदर्भात नुकतेच आदेश काढले आहेत. यानुसार रिक्षा चालकांना आता ४ रुपयांनी भाडे वाढ करता येणार आहे. त्यामुळे रिक्षा चालकांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

रिक्षा चालकांना ही भाडेवाढ येत्या १ सप्टेंबरपासून लागू होणार असून, पहिल्या एक किलोमीटरच्या टप्प्यासाठी रिक्षा चालकांना २५ रुपये आकारता येणार आहेत, तर पुढील प्रत्येक किलोमीटरसाठी १७ रुपये आकारता येणार आहेत. रिक्षा चालकांना पूर्वी पहिल्या टप्प्यातील एक किलोमीटरसाठी २१ रुपये भाडे आकारणी करता येत होती, तर त्या पुढील प्रत्येक किलोमीटरसाठी १४ रुपये भाडे दर आकारणे बंधनकारक होते. दरम्यान १ सप्टेंबरपासून मीटर पुन: प्रमाणीकरण करून घेतील, त्याच ऑटोरिक्षा धारकांकरिता भाडेसुधारणा लागू राहील. मीटर पुन: प्रमाणीकरण करण्याची मुदत ३१ ऑक्टोंबरपर्यंत आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या