21.4 C
Latur
Friday, October 7, 2022
Homeमहाराष्ट्रलोकशाहीत बोलण्याचा अधिकार

लोकशाहीत बोलण्याचा अधिकार

एकमत ऑनलाईन

मुंबई : ‘‘बच्चू कडू हे एकनाथ शिंदे यांचे सहकारी आहेत. बच्चू कडू यांचे काही मत असेल तर शिंदे आणि बच्चू कडू यांच्यात चर्चा होईल. लोकशाहीत सर्वांना बोलण्याचा अधिकार आहे. तो त्यांच्यापर्यंत मर्यादित ठेवावा,’’ असे आशिष शेलार म्हणाले.

‘धोका देणा-यांनी या महाराष्ट्राची बदनामी देशभरात केली. काँग्रेसच्या तत्कालीन नेतृत्वापासून कोणाच्या पाठीत कोणी खंजीर खुपसला, धोका कोणी केला, अंतर्गत काँग्रेसमध्ये कोणी धोका दिला, याची माहिती बच्चू कडू यांनी घ्यावी,’’ असे म्हणत आशिष शेलार यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेसवर टीका केली.

राज्य मंत्रिमंडळाचा नुकताच विस्तार झाला असून पहिल्या टप्यात शिंदे गटाचे ९ आणि भाजपाचे ९ अशा एकूण १८ नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. पहिल्या टप्प्यातील विस्तारामध्ये कोणत्याही अपक्ष नेत्याला संधी देण्यात आलेली नाही. याच कारणामुळे अपक्ष आमदार बच्चू कडू नाराज आहेत. मंत्रिपद न मिळाल्यामुळे हे धोका देणा-यांचे राज्य असून, धोका देईल तोच मोठा नेता होतो, त्यालाच मंत्रीपद मिळते असे उपहासात्मक भाष्य बच्चू कडू यांनी केले आहे. बच्चू कडू यांच्या याच भाष्यावर भाजपाचे नेते आशिष शेलार यांना प्रतिक्रिया दिली आहे. लोकशाहीत सर्वांना बोलण्याचा अधिकार आहे. बच्चू कडू यांनी हा अधिकार त्यांच्यापुरता मर्यादित ठेवावा, असा सल्ला आशिष शेलार यांनी दिला आहे.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या