17.5 C
Latur
Friday, December 2, 2022
Homeमहाराष्ट्रऋतुजा लटकेंनी घेतली आमदारकीची शपथ

ऋतुजा लटकेंनी घेतली आमदारकीची शपथ

एकमत ऑनलाईन

 

मुंबई : अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत निवडून आलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या आमदार ऋतुजा रमेश लटके यांना सोमवारी विधानसभा अध्यक्ष अ‍ॅड. राहुल नार्वेकर यांनी विधानसभा सदस्यत्वाची शपथ दिली.

उद्धव ठाकरे गटाच्या मशाल नव्या चिन्हावर निवडून आलेल्या त्या पहिल्या आमदार आहेत. शिवसेनेला धनुष्यबाण चिन्ह मिळण्यापूर्वी १९८५ साली छगन भुजबळ मशाल या चिन्हावर विधानसभेवर निवडून आले होते. विधानसभा सदस्य रमेश लटके यांच्या निधनामुळे अंधेरी (पूर्व) या विधानसभा मतदारसंघातील रिक्त झालेल्या जागेसाठी ३ नोव्हेंबर २०२२ रोजी पोटनिवडणूक घेण्यात आली होती. या पोटनिवडणुकीत ऋतुजा लटके निवडून आल्या आहेत.

या पोटनिवडणुकीवरून आधी राज्यातील राजकारण जोरदार तापले होते. मात्र नंतर भाजपाने आपली उमेदवारी मागे घेतली व ऋतुजा लटके यांच्या निवडून येण्याचा मार्ग सुकर झाला होता. ऋतुजा लटके या उद्धव ठाकरे गटाच्या मशाल नव्या चिन्हावर निवडून आलेल्या पहिल्या आमदार आहेत. सोमवारी विधानभवनात झालेल्या शपथविधी समारंभास विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गो-हे, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, माजी मंत्री तथा विधानपरिषद सदस्य अ‍ॅङ. अनिल परब, आमदार सुनील प्रभू आदी उपस्थित होते.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या