मुंबई : मुंबईच्या सत्र न्यायालयाने ड्रग्स प्रकरणात आरोपी असलेल्या रियाचा जामीन अर्ज फेटाळला आहे. न्यायालयाने रियासह सर्व 6 आरोपींची जामीन याचिका फेटाळली असल्याची महत्त्वाची माहिती मिळत आहे. ड्रग प्रकरणात रियासह शौविक चक्रवर्ती, सॅम्युएल मिरांडा, दीपेश सावंत, झैद विलांत्रा आणि बासित परिहार अशी सर्व 6 आरोपींची नावं आहेत.
याआधीही रियाने जामीनासाठी अर्ज केला होता पण कोर्टाने तिला जमीन नाकारला होता. रियाने दोन दिवस तुरुंगात काढले असून आज रियाचा तुरुंगात राहण्याचा तिसरा दिवस आहे.
दरम्यान, एनसीबीने 3 दिवस रियाची चौकशी केल्यानंतर मंगळवारी तिला अटक करण्यात आली. मॅजिस्ट्रेट कोर्टाने तिची जामिन याचिका आधीच फेटाळली आहे. रिया चक्रवर्तीच्या वतीने तिचे वकील सतिश मानेशिंदे यांनी जी जामिन याचिका दाखल केली होती, त्यात असं म्हटले होतं की, अटकेच्या दरम्यान रियाला कबुलीजबाब देण्यास भाग पाडले गेले. अभिनेत्री असे सर्व कबुलीजबाब औपचारिकरित्या मागे घेते आहे. याचिकामध्ये रियाने असेही म्हटले आहे की तिची अटक ‘अनावश्यक आणि विनाकारण केली गेली’.