22.8 C
Latur
Thursday, July 7, 2022
Homeमहाराष्ट्रपेणमध्ये एटीएम सेंटरवर दरोडा

पेणमध्ये एटीएम सेंटरवर दरोडा

एकमत ऑनलाईन

पेण : पेण शहरातील मुख्य रस्त्यावरील सनसिटी इमारतीमध्ये असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएम सेंटरवर दरोडा पडल्याची घटना उघडकीस आली आहे. दरोडेखोरांनी एटीएममधून ५६ लाखांची रोकड लंपास करून पोबारा केला. या दरोड्याच्या घटनेने पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, पेण शहरातील सनसिटी इमारतीमध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम सेंटर आहे. या एटीएम सेंटरवर दरोडा पडला. दरोडेखोरांनी तब्बल ५६ लाख ३४ हजार ८०० रुपये लांबवले. दरोड्याच्या घटनेची माहिती मिळताच, पेण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तपासासाठी फॉरेन्सिक पथकालाही पाचारण करण्यात आले होते. दरोडेखोरांचा माग काढण्यासाठी श्वान पथकाचीही मदत घेण्यात आली होती.

मागील महिन्यात पेण तालुक्यातील तरणखोप येथेही एका घरात लाखो रुपयांची चोरी झाली होती. पेण शहरातील मुख्य मार्गावरील आठ दुकानेही चोरांनी एकाच रात्रीत फोडून रोकड लंपास केली होती. या घटना ताज्या असतानाच, शहरातील मुख्य रस्त्यावरील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएम सेंटरला दरोडेखोरांनी लक्ष्य केले. गॅस कटरच्या साहाय्याने एटीएम मशिन फोडून ५६ लाखांहून अधिक रोकड लंपास केली. या दरोडेखोरांनी स्वत:बरोबर आणलेला गॅस कटर व सिलेंडर एटीएम सेंटरमध्येच टाकून पोबारा केला. पेण शहरात एका मागोमाग एक अशा अनेक चोरीच्या घटना घडत असल्याने चोरटे आणि दरोडेखोरांनी एकप्रकारे पेण पोलिसांनाच आव्हान दिले आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या