25.6 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeमहाराष्ट्रमिरजमधील समडोळी गावात दरोडा

मिरजमधील समडोळी गावात दरोडा

एकमत ऑनलाईन

सांगली : मिरज तालुक्यातील समडोळी येथे भाडेकरू पर्यटनासाठी गेल्याची संधी साधत बंद घराचा कडी-कोयंडा तोडून १५ लाखांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली आहे. अज्ञात चोरट्यांनी केलेल्या घरफोडीत सोन्या-चांदीचे दागिने व रोख रकमेसह १५ लाखांचा ऐवज लंपास केला. ही घटना सकाळी उघडकीस आली.

चोरट्यांनी २५ तोळे सोने, एक किलो चांदी, ७० हजारांची रोकड असा १५ लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. समडोळीतील नागरी वस्तीत असलेल्या एका मंदिरानजीकच्या घरामध्ये भाडेकरू म्हणून सन २०१३ पासून वास्तव्यास असलेले डॉक्टर प्रणय अशोक कौलापुरे हे सोमवारी सकाळी कुटुंबासह पर्यटनासाठी गेले होते. तथापि घरमालक हे कामानिमित्त आले असताना त्यांना डॉक्टर कौलापुरे यांच्या घराचा कडी-कोयंडा अज्ञाताने उचकटल्याचे निदर्शनास आले.

त्यांनी ही बाब डॉक्टर कोल्हापुरे यांच्या नातेवाईकांना दूरध्वनीवरून दिल्यानंतर त्यांनी परिस्थितीची खातरजमा करून सांगली ग्रामीण पोलिसांत अज्ञाताविरोधात फिर्याद दाखल केली आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या