24.8 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeमहाराष्ट्ररोहित शेट्टी यांनी घेतली अमित शहांची भेट

रोहित शेट्टी यांनी घेतली अमित शहांची भेट

एकमत ऑनलाईन

मुंबई : गोलमाल, सिंघम, सिंबा सारख्या चित्रपटांचा निर्माता आणि दिग्दर्शक रोहित शेट्टीनं केंद्रीय मंत्री अमित शहा यांची भेट घेतल्याने वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. ट्विट केलेल्या फोटोनंतर रोहित शेट्टीला नेटक-यांनी गंमतीशीर प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. काही दिवसांपूर्वी अक्षयने पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेऊन अनेकांना धक्का दिला होता.

द काश्मीर फाईल्सचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी मोदींची भेट घेऊन त्यांना आपल्या चित्रपटाविषयी अभिप्राय विचारला होता. यासगळ्यात रोहित शेट्टीची इंट्री म्हणजे काही मोठा धमाका होणार आहे. असे बोलले जात आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे सध्या मुंबईच्या दौ-यावर आहेत.

यासगळ्यात रोहित शेट्टीनं त्यांची घेतलेली भेट ही एका खास कारणासाठी असल्याचे बोलले जात आहे. सोशल मीडियावर त्यांचे फोटो व्हायरल झाले असून त्याला नेटक-यांनी गंमतीशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. रोहित आता तू राजकारणात तर येत नाहीस ना, असेही त्याला चाहत्यांनी विचारले आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या