22.1 C
Latur
Monday, August 8, 2022
Homeमहाराष्ट्रडेक्कन क्वीनमध्ये छत कोसळले

डेक्कन क्वीनमध्ये छत कोसळले

एकमत ऑनलाईन

पुणे : डेक्कन क्वीन रेल्वेच्या वातानुकूलित ‘सी२’ बोगीतील शौचालयाच्या छताचा काही भाग कोसळला. या घटनेत कोणीही जखमी झालेले नाही. मात्र, या दुर्घटनेमुळे प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्­नचिन्ह उभे केले आहे.

निकृष्ट दर्जाच्या कामामुळे ही घटना घडली असल्याचा आरोप केला जात आहे.डेक्­कन क्वीन एक्­स्प्रेसला २२ जूनपासून एसएचबी कोच व वातानुकूलित डबे जोडण्यात आले आहेत. चेन्नई येथील इंटिग्रल कोच फॅक्­टरी (आयसीएफ) येथे या नवीन एलएचबी डब्यांची निर्मिती करण्यात आली आहे.

रेल्वे प्रवाशी मंचाच्या अध्यक्षा हर्षा शहा म्हणाल्या, रेल्वेकडून केल्या जाणा-या तपासणीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या दुर्घटनेत सुदैवाने कोणीही जखमी झालेले नाही.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या