24.7 C
Latur
Thursday, July 7, 2022
Homeमहाराष्ट्र६ व्या जागेसाठी रस्सीखेच

६ व्या जागेसाठी रस्सीखेच

एकमत ऑनलाईन

मुंबई : सर्व पक्षांनी राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी सहकार्य करावे, असे आवाहन करणारे संभाजीराजे यांच्या अडचणी शिवसेनेने वाढविल्या. आता त्या अडचणी सोडवून राज्यसभेत जाण्याचा मार्ग मोकळा करण्यासाठी संभाजीराजे यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यांच्यासोबत त्यांनी जवळपास ३५ मिनिटे चर्चा केली आणि त्यांनी आपल्याला पाठिंबा देण्याची मागणी केली. दुसरीकडे भाजपदेखील ६ व्या जागेसाठी उमेदवार मैदानात उतरविण्याच्या प्रयत्नात आहे. त्यामुळे या जागेसाठी रस्सीखेच पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्र्यांनी अपक्ष आमदारांची बैठकही घेतली.

संभाजीराजे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. यावेळी त्यांच्यात जवळपास ३५ मिनिटे चर्चा झाली. मात्र, ते माध्यमांशी न बोलता निघून गेले. दरम्यान, वरिष्ठ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संभाजीराजे यांना राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेनेचे अधिकृत उमेदवार म्हणून अर्ज भरण्याचा प्रस्ताव दिला.

मात्र, संभाजीराजेंनी शिवसेनेच्या या प्रस्तावात सुधारणा करण्याची विनंती मुख्यमंत्र्यांना केली. माझी उमेदवारी शिवसेनेच्या सहकार्याने महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवार म्हणून जाहीर करावी, असा प्रस्ताव संभाजीराजेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना दिला. संभाजीराजे यांच्या या प्रस्तावावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विचार करून कळवतो असे सांगितले. त्यामुळे शिवसेना संभाजीराजेंचा प्रस्ताव मान्य करणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

तत्पूर्वी, खा. संजय राऊत यांनी ​राज्यसभेच्या ६ व्या जागांसाठी महाराष्ट्रात घोडेबाजार सुरू करण्याची विरोधकांची इर्षा दिसत आहे. कोणी कितीही आकडेमोड करा, आकडे आणि मोड दोन्ही महाविकास आघाडीकडे आहे. राज्यसभेची निवडणूक लढू आणि जिंकूही, अशा शब्दात काल त्यांनी इशारा दिला होता.

भाजपचे केंद्रीय नेतृत्व निर्णय घेईल
राज्यसभेसाठी तिसरा उमेदवार देण्यासंबंधी केंद्रीय नेतृत्व निर्णय घेईल. महाराष्ट्रातून भाजपच्या २ जागा तर येतच आहेत. आम्ही संभाजीराजे यांना राज्यसभेवर पाठवले होते. अशा प्रकारच्या निवडणुकांबाबत केंद्रीय स्तरावर निर्णय होतो. छत्रपती संभाजीराजे यांच्यासंदर्भात देखील निर्णय घेण्याचे अधिकार हे केंद्रीय नेतृत्वाकडे आहेत, असे फडणवीस म्हणाले.

६ जागांसाठी निवडणूक
जूनमध्ये राज्यसभेची निवडणूक होत आहे. राज्यातील ६ जागांसाठी मोठी चुरस रंगली आहे. या ६ जागांपैकी २ जागा भाजपच्या वाट्याच्या आहेत. तर प्रत्येकी एक जागा शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या वाट्याची आहे. मात्र, सहाव्या जागेसाठी रस्सीखेच होताना दिसत आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या