33.9 C
Latur
Tuesday, March 9, 2021
Home महाराष्ट्र नियम सर्वाना सारखेच, पोहरादेवी येथील गर्दीबाबत तात्काळ कारवाई करावी

नियम सर्वाना सारखेच, पोहरादेवी येथील गर्दीबाबत तात्काळ कारवाई करावी

एकमत ऑनलाईन

मुंबई,दि.२३ (प्रतिनिधी) पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामुळे अडचणीत आलेल्या वनमंत्री संजय राठोड यांनी पोहरादेवी येथे केलेल्या शक्तीप्रदर्शनामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चांगलेच नाराज झाले आहेत. या प्रकाराची गंभीर दखल घेताना संबंधितांवर जिल्हा व पोलीस प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी, असे निर्देश उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. तसेच वाशीम जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षकांकडून सहविस्तर अहवाल मागवण्याच्या सूचनाही त्यांनी मुख्य सचिवांना दिल्या आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे सार्वजनिक कार्यक्रमावर बंदी घातली असून, नियमाचे काटेकोर पालन केलर नाही तर राज्यात पुन्हा लॉकडाऊन करावा लागेल असा इशारा दिला आहे. ‘मी जबाबदार’ अशी मोहिमही सुरू केली आहे. त्यांच्या या घोषणेला पुरते दोन दिवस होत नाहीत तोवर त्यांच्याच मंत्रिमंडळातील, त्यांच्याच पक्षाच्या वनमंत्री संजय राठोड यांनी आज वाशीम जिल्ह्यातील पोहरादेवी देवस्थान येथे जोरदार शक्तिप्रदर्शन करून मुख्यमंत्र्यांचे आदेश पायदळी तुडवले. याची गंभीर दखल घेऊन मुख्यमंत्र्यांनी स्थानिक प्रशासनाला कारवाईचे आदेश दिले आहेत. राज्यातील कोविड परिस्थितीसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी वर्षा येथे बैठकीत आढावा घेतला तसेच मुंबई महानगर क्षेत्रातील महानगरपालिका आयुक्तांशी देखील संसर्ग रोखण्यासंदर्भात करीत असलेल्या उपाययोजनांची माहिती घेतला.

गेले वर्षभर आपण अतिशय संयमाने व निर्धाराने कोविडची लढाई लढत आहोत. आपले अनेक आरोग्य कर्मचारी, पोलीस तसेच प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी जीवावर उदार होऊन हा संसर्ग रोखण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. सर्वात महत्वाचे म्हणजे या संपूर्ण काळात सर्व महत्वाचे धार्मिक सण आणि उत्सव नागरिकांनी शांततेत आणि शासनाने आखून दिलेल्या नियमाप्रमाणे पार पाडले. या काळात मोठमोठी धार्मिक स्थळे देखील नियमांचे पालन करीत होती आणि आता देखील मिशन बिगिन अगेनमध्ये या कार्यपद्धतीचे पालन करणे आपली जबाबदारी असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. आपण परवाच सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्व प्रकारच्या धार्मिक, राजकीय, सामाजिक कार्यक्रमांना परवानगी मिळणार नाही हे याचसाठी सांगितले. कोरोनाची दुसरी लाट येणे आपल्या सगळ्यांसाठी काळजीचा विषय आहे. शासन संकटाचा सामना करण्यासाठी तयार आहेच पण नागरिक म्हणून प्रत्येकाची वैयक्तिक जबाबदारी पण आहे हे सर्वानी लक्षात ठेवावे, असेही मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,445FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या