26.5 C
Latur
Friday, December 9, 2022
Homeमहाराष्ट्रऋतुजा लटके यांची राजीनामा मंजूर करण्यासाठी पळापळ

ऋतुजा लटके यांची राजीनामा मंजूर करण्यासाठी पळापळ

एकमत ऑनलाईन

मुंबई : शिवसेनेचे दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे अंधेरी पूर्व विधानसभेत पोटनिवडणूक होत आहे. या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीकडून दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्यात आली. पण या उमेदवारीनंतरही उद्धव ठाकरेंच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या अडचणी काही थांबण्याच्या नाव घेत नाही आहेत.

ऋतुजा लटके या महापालिकेच्या कर्मचारी असल्याने त्यांच्या उमेदवारीपुढे प्रशासकीय अडचण येण्याची शक्यता आहे. महापालिका सेवा नियमावलीनुसार राजीनामा दिल्यानंतर किंवा स्वेच्छा निवृत्तीचा अर्ज केल्यानंतर तीन महिन्यांच्या आता तो मंजूर व्हावा लागतो. विशेष म्हणजे ऋतुजा लटके यांनी रमेश लटकेंच्या निधनानंतर प्रशासकीय सेवेचा राजीनामा दिला, परंतु अद्यापही मंजूर झालेला नाही. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे अनिल परबांची चांगली धावाधाव सुरू आहे. परबांच्या नेतृत्वाखाली माजी नगरसेवकांची टीम महापालिका आयुक्त आणि सामान्य प्रशासन विभागाच्या येरझ-या मारताना दिसत आहेत. त्यामुळे ऋतुजा लटके यांचा महापालिका आयुक्तांनी राजीनामा मंजूर केला नाही तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेपुढे मोठा पेच निर्माण होण्याची शक्यता आहे.

ऋतुजा लटके या महापालिका परिमंडळ उपायुक्तांच्या कार्यालयात सेवेला आहेत. विशेष म्हणजे हा विभाग महापालिका आयुक्तांच्या अंतर्गत येतो. ऋतुजा लटके यांनी महिन्याभरापूर्वीच राजीनाम्याचा अर्ज सादर केला होता. तसेच तो तातडीने मंजूर करण्याची विनंतीही केली होती. तरीही तो मंजूर झालेला नाही. त्यानंतर आता उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेना पक्षाचे नेते अनिल परब यांनी शिष्टमंडळासह महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांची भेट घेतली असून, त्यांच्याकडे ऋतुजा लटके यांचा राजीनामा तातडीने मंजूर करण्याची विनंती केली आहे. तसेच यावेळी अनिल परब यांच्यासोबत मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर, माजी नगरसेवक मनोहर पांचाळ, सुभाष कांता सावंत, प्रमोद सावंतसुद्धा त्या शिष्टमंडळात होते.

 

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या