24.4 C
Latur
Monday, September 20, 2021
Homeमहाराष्ट्ररशियाची ‘स्पुतनिक व्ही’ लस पुण्यात दाखल

रशियाची ‘स्पुतनिक व्ही’ लस पुण्यात दाखल

एकमत ऑनलाईन

पुणे : कोविशिल्ड, कोवॅक्सिन या कोरोना प्रतिबंधक लसीनंतर रशियाची ‘स्पुतनिक व्ही’ ही लस पुण्यात वापरासाठी दाखल झाली आहे. पहिल्या टप्प्यात साधारण ६०० डोस पुणेकरांसाठी उपलब्ध झाले आहेत. खासगी रुग्णालयांमध्ये या लसीच्या एका डोसची किंमत ११४२ रुपये इतकी असणार आहे. स्पुतनिक व्ही लस पुणेकरांना २८ जूनपासून दिली जाणार आहे. या लसीच्या डोससाठी कोविन अ­ॅप व पोर्टलवर नोंदणी करणे गरजेचे राहणार आहे.

मॉस्कोतील गॅमालिया इन्स्टिट्यूटद्वारे ही लस विकसित करण्यात आली असून हैदराबाद येथील डॉ. रेड्डीज लॅबोरेटरी यांच्याकडून रशियाच्या स्पुतनिक व्ही लसीचे भारतातील वितरण सुरू आहे. राज्यातील व पुण्यातील गॅलेक्सी रुग्णालयात स्पुतनिक व्ही लसीचा पहिला डोस काही दिवसांपूर्वी डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजच्या ३६ वर्षीय व्यक्तीला देण्यात आला होता अशी माहिती डॉ. शैलेश पुणतांबेकर यांनी दिली आहे.

कोविशील्ड, कोवॅक्सिनसह ‘स्पुतनिक व्ही’ या लसीच्या दोन डोसमधील अंतर निश्चित करण्यात आले आहे. पहिला डोस घेतल्यानंतर स्पुतनिक व्ही लसीचा दुसरा डोस २१ दिवसांनंतर घ्यायचा आहे. ही लस विकसित करण्यासाठी सर्दीच्या विषाणूचा उपयोग करण्यात आला आहे. स्पुतनिक व्ही लसीला भारतासह एकूण ५५ देशांमध्ये वापरासाठी मान्यता मिळाली आहे. भारतासारख्या उष्ण तापमानाच्या देशात ही यशस्वी ठरू शकते अशी शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. तसेच या लसीमुळे नागरिकांना लसीकरणासाठी तिसरा पर्याय उपलब्ध झाला आहे. स्पुतनिक व्ही लसीमुळे कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची मोहीम गतिमान होण्यास मदत होणार आहे. कोरोनाविरुद्ध स्पुतनिक व्ही लस ९२ टक्के प्रभावी आहे.

हुजुरेवाला…!

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
196FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या