22.1 C
Latur
Friday, January 28, 2022
Homeमहाराष्ट्रसचिन सावंतांचा प्रवक्तेपदाचा राजीनामा

सचिन सावंतांचा प्रवक्तेपदाचा राजीनामा

एकमत ऑनलाईन

मुंबई : सचिन सावंत यांनी पक्षाच्या प्रवक्तेपदाचा राजीनामा दिला आहे. सचिन सावंत हे वृत्तवाहिन्यांवरील वेगवेगळ्या वादविवाद कार्यक्रमात काँग्रेसची बाजू मांडत असतात. मोदी सरकारचे कडवे टीकाकार म्हणून त्यांना ओळखले जाते. पण सध्या सचिन सावंत पक्षामध्ये नाराज आहेत. हायकमांडला थेट पत्र लिहून प्रवक्तेपदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्याची त्यांनी विनंती केली आहे.

मागील १० वर्ष सचिन सावंत यांनी पक्षाचे मीडिया इंचार्ज म्हणून काम केले आहे. त्यातच पक्षात मुख्य प्रवक्तेपद तयार करून त्या पदावर सचिन सावंत यांना डावलून अतुल लोंढे यांची नियुक्ती करण्यात आली. त्यामुळे सचिन सावंत यांनी प्रवक्तेपदाचा राजीनामा दिला आहे. अतुल लोंढे यांची मुख्य प्रवक्तेपदी नियुक्ती केली आहे. आघाडी संघटना, विभाग व सेलची जबाबदारी माजी मंत्री सुनिल देशमुख यांच्याकडे देण्यात आली आहे. सोशल मीडिया विभागाची जबाबदारी विशाल मुत्तेमवार यांच्याकडे व निवडणूक व्यवस्थापन समितीच्या प्रमुखपदी रमेश शेट्टी यांची व प्रशिक्षण विभागाची जबाबदारी माजी आमदार रामहरी रूपनवर यांच्याकडे देण्यात आली आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या