मुंबई : बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान आणि प्रसिद्ध लेखक सलीम खान या पिता-पुत्राला जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. यामुळं खळबळ उडाली असून याप्रकरणी वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, सलिम खान सकाळी जॉगिंगला गेले असताना एका बाकड्यावर ते विश्रांतीसाठी बसले होते. या बाकड्यावर धमकीचं पत्र ठेवलेलं होतं. यामध्ये सलमान खान आणि सलीम खान यांची पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांच्याप्रमाणं मारण्यात येईल, असं म्हटलं आहे. दरम्यान, सलमान खानचं घर आणि ज्या ठिकाणी हे धमकीचं पत्र मिळालं त्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. या सीसीटीव्हीतून जे कोणी संशयित आरोपी सापडतील त्यांना बोलावून त्यांची चौकशी केली जाणार आहे.