मुंबई : बिश्नोई गँगकडून ठार मारण्याची धमकी आल्यानंतर सलमान खानने आता वेपन्सच्या लायसन्ससाठी अर्ज केला आहे. याच संबंधी त्याने आज मुंबई पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर यांची भेट घेतली.
सलमान खानचे वडील सलीम खान यांना काही दिवसांपूर्वी धमकीचे पत्र आले होते. मुसेवालाचा मारेकरी लॉरेन्स बिश्नोईने सलमान खानला ठार मारण्याची धमकी दिली होती. त्यासाठी शस्त्रपरवाना हवा आहे.