मुंबई : महामारीमुळे अनेकांची घरं उद्ध्वस्त झाली,आपल्या जीवाची परवा न करता दिवसरात्र झटणारे पोलीस आणि डॉक्टर यांच्या कामाचं काही मोल नाही. काल वटपौर्णिमा हा सण साध्यापद्धतीने का होईना साजरा करण्यात आला. पण आपल्या पोलीस दलातील महिलांनी स्त्रीचं आणि तिच्या कर्तव्याचं एक अनोख रुप आपल्याला दाखवलं आहे.
काल वटपौर्णिमा सण सगळीकडे साजरा करण्यात आला. #Covid19 च्या लढ्यात लढणाऱ्या आमच्या महिला #पोलीस भगिनींनी कर्तव्य बजावत असतानाच वटपौर्णिमा साजरी करून हा सण आनंदात साजरा केला. या भगिणीचं कर्तव्याप्रती समर्पण #महाराष्ट्र कधीही विसरणार नाही. pic.twitter.com/KWrCrIf1FR
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) June 6, 2020
फोटो शेअर करत त्यांनी या महिलांचं कौतूक
वटपौर्णिमा म्हटलं की, घरात गोडाचं जेवण, देवाला नैवेद्य, नवीन साडी, श्रृगांर अशा अनेक गोष्टी आल्या. पण पोलीस दलात काम करणाऱ्या या महिला पोलीस अधिकाऱ्यांनी आपल्या कर्तव्याला सुंदरचं लेणं माणून पोलीस गणवेशातच वडाची पूजा केली आहे.गृहमंत्री अनिल देशमुखांनी यासंबंधी एक ट्वीट केलं आहे. यामध्ये पोलीस महिला वडाची पूजा करत असल्याचे काही फोटो शेअर करत त्यांनी या महिलांचं कौतूक केलं आहे. खरंतर आपलं काम आणि आपली देशसेवा यासाठी अहोरात्र काम करणाऱ्या पोलीस दलाचे आभारच मानायला हवेत. आज त्यांच्या सतर्कतेमुळे आपण सुरक्षित आणि आनंदाने सण साजरे करू शकतो.
अनिल देशमुखांनी ट्वीट करताना लिहलं की, ‘काल वटपौर्णिमा सण सगळीकडे साजरा करण्यात आला. Covid19 च्या लढ्यात लढणाऱ्या आमच्या महिला पोलीस भगिनींनी कर्तव्य बजावत असतानाच वटपौर्णिमा साजरी करून हा सण आनंदात साजरा केला. या भगिणीचं कर्तव्याप्रती समर्पण #महाराष्ट्र कधीही विसरणार नाही.’
Read More पहिलाच प्रयोग दिलासादायक :कोरोना रूग्णांवर कोल्हापुरात यशस्वी प्लाझ्मा थेरेपी