24.7 C
Latur
Thursday, July 7, 2022
Homeमहाराष्ट्रराज्यसभेच्या निवडणुकीतून संभाजीराजेंची माघार

राज्यसभेच्या निवडणुकीतून संभाजीराजेंची माघार

एकमत ऑनलाईन

मुंबई : शिवसेनेने माझ्यासमोर पक्ष प्रवेशाची अट कायम ठेवली होती, पण मी स्पष्ट शब्दात नकार दिल्याचे वक्तव्य संभाजीराजे छत्रपती यांनी केले. छत्रपतीला आम्हाला बाजूला ठेवायचे नाही. बरोबर ठेवायचे आहे. त्यामुळे तुम्ही शिवसेनेत प्रवेश करावा असा प्रस्ताव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माझ्यासमोर ठेवला होता, असे संभाजीराजे यांनी सांगितले. दरम्यान, यावेळी संभाजीराजे यांनी मोठा निर्णय घेतला आहे. मी राज्यसभा निवडणुकीला सामोरे जाणार नाही, पण ही माझी माघार नसून, स्वाभिमान असल्याचे संभाजीराजे म्हणाले.

राज्यसभेचा कार्यकाळ संपल्यानंतर पुढची वाटचाल कशी असणार अशी चर्चा होती. त्यावेळी मी दोन राजकीय निर्णय जाहीर केले होते. त्यावेळी मी बोललो होतो की राज्यसभा निवडणुक लढवणार आहे. पुढचा प्रवास किती खडतर आहे हे मला माहिती होते. मागील १५ ते २० वर्षे मी काम करतो आहे. खासदारकी असताना समाजाची भूमिका मांडण्याचा प्रयत्न मी करत होतो. त्यामुळेच माझी इच्छा होती की सर्व

पक्षांनी मिळून मला राज्यसभेत पाठवावे असे संभाजीराजे म्हणाले. मी मुख्यमंत्र्यांना सांगू इच्छितो की, शिवाजी महाराज यांचे स्मारक असेल तिथे आपण दोघांनी जायचे आणि संभजीराजे खोटे बोलतायत का हे सांगायच असेही संभाजीराजे यावेळी म्हणाले.
मुख्यमंत्री ठाकरेंनी शब्द पाळला नाही

मला दोन खासदार भेटायला आले आणि त्यांनी मला सांगितले की शिवसेनेत तुम्ही प्रवेश करा. उद्या आपली उमेदवारी जाहीर करु. त्यानंतर मुख्यमंर्त्यांचाही मला फोन आला. त्यांनी मला भेटायला बोलवलं होतं असेही ते म्हणाले. त्यांनी आम्हाला सांगितले की, छत्रपती आमच्यासोबत हवे आहेत. शिवसेनेत प्रवेश करावा असे त्यांनी सांगितले, पण मी त्यांना सांगितले की मी अपक्ष निवडणूक लढवणार आहे. त्यांना मी प्रस्ताव सांगितले की, मला महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवार घोषित करा. पण मुख्यमंत्री म्हणाले की, हे शक्य होणार नाही. परंतू ते म्हणाले की शिवसेना पुरस्कृत उमेदवार व्हा. त्यानंतर मी कागदपत्रे तयार करण्यासाठी कोल्हापूरला गेल्याचे संभाजीराजेंनी सांगितले.

आमदारांच्या पाठीशी आयुष्यभर उभा राहणार
कोल्हापूरला जाताना मी बातम्या पहिल्या की कोल्हापूरच्या एका व्यक्तीला उमेदवारी दिली. संभाजीराजे शिवबंधन बांधणार अशा बातम्या दिल्या गेल्या. यावेळी मी मुख्यमंत्र्यांना फोन केला, परंतु त्यांनी फोन उचलला नाही. त्यांनी शब्द पाळला नाही. असेही संभाजीराजे म्हणाले. येणा-या काळात विस्तापित मावळ्यांना एकत्र करण्याचे काम मी करणार आहे. मी स्वराज्यच्या माध्यमातून उभा राहणार आहे.

घोडेबाजार होऊ नये म्हणून निवडणूक लढविणार नाही
शिवसेनेने ऑफर दिली ती स्वीकारली असती तर मी खासदार झालो असतो. मला सर्व आमदार म्हणत आहेत की, आपण निवडणूक लढवावी. परंतू मला माहिती आहे. त्याठिकाणी घोडेबाजार होणारं आहे असेही संभाजीराजे म्हणाले. घोडेबाजार होऊ नये म्हणून मी निवडुकीला समोर जाणार नाही, ही माझी माघार नसून हा माझा स्वाभिमान असल्याचे संभाजीराजे म्हणाले.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या