मुंबई. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो चे माजी झोनल डायरेक्टर आणि सध्या डीजीटीएस (डारेक्टोरेट जनरल ऑफ टॅक्सपेयर सर्व्हिसेस) विभागात कार्यरत असलेले समीर वानखेडे यांच्या राजकारणातील प्रवेशाच्या चर्चा सुरु आहेत. ते २०२४ ची लोकसभा निवडणूक लढवण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.
आयआरएस समीर वानखेडे यांनी नागपुरातील आरएसएसच्या मुख्यालयात अनेक बड्या नेत्यांशी संपर्क साधला आहे. वानखेडे यांच्या राजकाणातील प्रवेशाच्या चर्चा जोरदार सुरु आहेत.
एवढेच नाही तर सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ते महाराष्ट्रातील वाशिम जिल्ह्यातून २०२४ मध्ये होणारी लोकसभा निवडणूकही लढवू शकतात. मात्र, याबाबत समीर वानखेडे यांना विचारणा केली असता त्यांनी यावर काहीही बोलण्यास नकार दिला.
२०२४ पूर्वी भाजपमध्ये प्रवेशाच्या चर्चा :
वास्तविक, याआधीही समीर वानखेडे सातत्याने वाशिम परिसराचा दौरा करत आहेत. वाशिम हा समीर वानखेडेचा मूळ जिल्हा आहे. या दौ-यांमुळे त्यांच्यावर सातत्याने शंका घेतली जात असली तरी त्यांचा राजकारणात प्रवेश करण्याच्या अटकळांना जोर आला आहे. मात्र ते अधिकृतपणे काहीही बोलण्यास ते टाळत आहेत.