26.9 C
Latur
Monday, July 4, 2022
Homeमहाराष्ट्रसंदीप देशपाडेंना अटक आणि तत्काळ जामीन

संदीप देशपाडेंना अटक आणि तत्काळ जामीन

एकमत ऑनलाईन

मुंबई : मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाले होते. त्यावेळी एक महिला पोलिस देखील जखमी झाली. यानंतर सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी देशपांडेंवर गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस देशपांडे यांना शोधत होते. अखेर तत्काळ कारवाई करत देशपांडेंच्या ड्रायव्हरला अटक करण्यात आली. मात्र, संदीप देशपांडेंसह संतोष धुरी दोघेही फरार होते. अखेर त्यांना अटक करण्यात आली.

पोलिसांनी तत्काळ दोघांनाही कोर्टात दाखल केल्यानंतर १५ हजारांच्या जातमुचलक्यावर त्यांना सोडण्यात आलंय. कोर्टाने अटकपूर्व जामीन देताना सांगितलं होतं की अटक झाल्यास १५ हजारांच्या जाचमुचलक्यावर तात्काळ सुटका करावी. त्यानंतर संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांनी आज कायदेशीर प्रक्रिया पार पाडली आहे.

देशपांडे आणि धुरी यांच्यावर सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल होता. सत्र न्यायालयाने या गुन्ह्यात त्यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या