23.8 C
Latur
Tuesday, September 27, 2022
Homeमहाराष्ट्रसंदीप देशपांडे अडचणीत; गुन्हा दाखल होणार?

संदीप देशपांडे अडचणीत; गुन्हा दाखल होणार?

एकमत ऑनलाईन

मुंबई : मुंबई पोलिसांकडून ताब्यात घेतले जात असताना पळ काढणारे मनसेचे सरचिटणीस आणि प्रवक्ते संदीप देशपांडे हे अडचणीत सापडले आहेत. कारण या प्रकरणात पोलिसांकडून देशपांडे यांच्यावर सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात येऊ शकतो, अशी माहिती समोर येत आहे. मशिदीवरील भोंगे हटवण्याची मागणी करत राज्यभरात मनसे कार्यकर्त्यांकडून मशिदीसमोर हनुमान चालिसा लावण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसेच मुंबईत काही नेत्यांकडून आक्रमक वक्तव्येही केली जात आहेत.

या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून संदीप देशपांडे यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र यावेळी देशपांडे यांनी घटनास्थळावरून पोबारा केला. तसेच देशपांडे यांच्या गाडीचा धक्का लागून एक महिला पोलिस कर्मचारी रस्त्यावर पडली. या घटनेत सदर महिला कर्मचारी जखमी झाल्याचेही सांगितले जात आहे. दरम्यान, या प्रकरणी सीसीटीव्ही फुटेज तपासून पोलिस संदीप देशपांडे यांच्यावर गुन्हा दाखल करतील, असे समजते. त्यामुळे पोलिसांकडून पुढील काही तासांत देशपांडे यांच्यावर खरंच कारवाई केली जाते का, हे पाहावे लागेल.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या