22.1 C
Latur
Friday, January 28, 2022
Homeमहाराष्ट्रसांगलीस पुराचा धोका; शेकडो बाधितांचे स्थलांतर; कोल्हापुरातील नद्याही तुडुंब

सांगलीस पुराचा धोका; शेकडो बाधितांचे स्थलांतर; कोल्हापुरातील नद्याही तुडुंब

एकमत ऑनलाईन

सांगली : सांगलीत कृष्णा नदीची पाणीपातळी ३४ फुटांवर गेल्याने नदीकाठच्या सखल भागात पुराचे पाणी शिरले आहे. शहरातील सूर्यवंशी प्लॉट, दत्तनगर, काका नगर, नवीन बायपास रोड या परिसरातील घरांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर सुरू झाले आहे. कृष्णा नदीसह वारणा नदीची पाणीपातळी झपाट्याने वाढल्यामुळे नदीकाठावरील १०४ गावांमध्ये सतर्कतेचा इशारा दिला आहे. तसेच सखल भागातील नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

सांगली शहरात रात्रीपासून चारशेहून अधिक लोकांचे स्थलांतर करण्यात आले. पूरबाधितांसाठी शहरातील शाळा आणि रिकाम्या इमारतींमध्ये थांबण्याची व्यवस्था केली आहे. एनडीआरएफचे एक पथक सांगलीत, तर दुसरे पथक आष्टा येथे तैनात असून, पूरबाधितांना सुरक्षित स्थळी हलविण्याचे काम पथकांकडून सुरू आहे. दरम्यान, रविवारी रात्रीपासून पावसाचा जोर वाढल्याने कृष्णा नदीची पाणीपातळी ३४ फुटांवर पोहोचली आहे, तर वारणा नदीही इशारा पातळीवर पोहोचली आहे.

वारणा धरण क्षेत्रात अतिवृष्टी सुरू असल्याने वारणा नदीत पंधरा हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. कोयना धरण क्षेत्रातील अतिवृष्टीमुळे कोयना धरणातून ५५ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने सांगलीत पुराचा धोका वाढला आहे. कृष्णा नदीचे पाणी झपाट्याने वाढत असल्याने महापुराच्या पुनरावृत्ती होते की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे.

जयंत पाटील यांनी घेतला स्थितीचा आढावा

संभाव्य पुराचा धोका लक्षात घेता सांगली जिल्ह्यातील नदीकाठच्या गावांना बोटी दिल्या जात आहेत. वाळवा तालुक्यातील वाळवा व शिरगाव या गावांना पालकमंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते बोटी प्रदान करण्यात आल्या. यावेळी मंत्री जयंत पाटील यांनी नदीकाठच्या गावांना भेट दिली व संभाव्य पूरपरिस्थितीबाबत नागरिकांना स्वत: माहिती देत धीर दिला.

धरण क्षेत्रात तर अतिवृष्टी

कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात दमदार पाऊस पडत असल्यामुळे वारणा राधानगरी आणि कोयना या सर्वच धरणातून प्रचंड प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. दमदार पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत पुन्हा वाढ झाली असून पंचगंगा नदी इशारा पातळीवरून वाहत आहे. गेले दोन दिवस पुन्हा एकदा या दोन्ही जिल्ह्यात पावसाने जोर धरला आहे. रविवारी दिवसभर आणि रात्रभरही पाऊस धो-धो कोसळत होता. धरण क्षेत्रात तर अतिवृष्टी सुरू असल्याने राधानगरीचे चार दरवाजे उघडले आहेत.

यामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली असून ती आता इशारा पातळी पर्यंत पोहोचली आहे. जिल्ह्यातील सर्व धरणे फुल्ल भरल्या आहेत. नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाल्यामुळे ९४ बंधारे पुन्हा एकदा पाण्याखाली गेली आहेत. अनेक रस्त्यावर पाणी आल्यामुळे वाहतूक बंद करण्यात आली आहे. अति पावसामुळे महापूराची शक्यता निर्माण झाली आहे यामुळे प्रशासनाने नदीकाठावरील नागरिकांनी तातडीने सुरक्षित स्थळी जावे हे असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान राधानगरी धरणाचे चार स्वयंचलित दरवाजे उघडले असुन धरणातून ७११२ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

सांगलीच्या कर्नाळ रोडवर पाणी

कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली असून सांगली-पलूस मार्गावरील कर्नाळ रोडवर पाणी आल्याने शिवशंभो चौकातून सांगलीकडे येणारा मार्ग बंद करण्यात आला आहे. या मार्गावरील वाहतूक बायपासमार्गे वळवण्यात आली आल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली. या ठिकाणी अग्निशामक दलाचे जवान, पोलीस आणि मनपाचे कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

अलमट्टी पाण्याचा विसर्ग सुरू

कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यात उद्भवणा-या महापुराच्या पार्श्वभूमीवर राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील व आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर कर्नाटकचे जलसंपदामंत्री रमेश जारकीहोळी यांची समन्वय समिती स्थापन केली आहे. या समितीच्या माध्यमातून चर्चा करून अलमट्टीतील पाणीसाठा आणि विसर्गाबाबत चर्चेवरून आज धरणातून २५०००० पाण्याचा विसर्ग सुरू आहे. सध्या अलमट्टित पाणी पातळी ५१८.८० मी. असून पाण्याचा साठा १०९.७६ टि.एम.सि. आहे. तर धरणात १२७५८ पाण्याच आवक झाली आहे.

शिरूर अनंतपाळ तालुक्यावर जलसंकट?

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या